बेळगाव जिल्ह्यातील 'या' 5 तालुक्यामध्ये लॉकडाऊन जाहीर - जिल्हाधिकारी

बेळगाव जिल्ह्यातील 'या' 5 तालुक्यामध्ये लॉकडाऊन जाहीर - जिल्हाधिकारी

belgavkar.com | belgaum | belgavkar

Lockdown आज रात्री 8 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन Coronavirus

बेळगाव शहर व तालुक्यामध्ये लाॅकडाऊन नाही

बेळगाव जिल्ह्यातील
गोकाक, मुडलगी, अथणी, कागवाड आणि निपाणी
या तालुक्यांमध्ये आज दिनांक 14 जुलै रात्री 8 वाजल्यापासून 22 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. बेळगाव जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी या तालुक्यांमध्ये लाॅकडाऊन जारी केला आहे. या तालुक्यातील जनतेने लॉकडाऊन मार्गसुचीचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केले आहे.
बेळगाव शहर व तालुक्यामध्ये लाॅकडाऊन नाही
शासनाने जाहीर केलेली लॉकडाऊन मार्गसुचीची कडक अंमलबजावणी करण्याबाबत त्या तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोना चे वाढते संक्रमण आणि मृत्यूचे प्रमाण याचा विचार करून तसेच तज्ञांशी चर्चा करून जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी कठोर उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत. खानापूर रामदूर्ग, सौंदत्ती, कित्तूर, हुक्केरी, बैंलहोंगल आणि रायबाग तालुक्यात लाॅकडाऊन नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यातील 'या' 5 तालुक्यामध्ये लॉकडाऊन जाहीर - जिल्हाधिकारी
Lockdown आज रात्री 8 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन Coronavirus

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm