बेळगाव : ना SMS ना Call तरीही बँकेतील लाखो रुपये लांबवले

बेळगाव : ना SMS ना Call तरीही बँकेतील लाखो रुपये लांबवले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बँक ऑफ महाराष्ट्र व एसबीआयच्या खातेदारांचे रविवारी (12 जुलै) दिवसभरात लाखो रुपये बेळगाव, बंगळूर व हुबळीतील एटीएममधून काढल्याचा प्रकार घडला. खातेदारांनी सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांसमोर तापासाचे आव्हान उभे राहिले आहे. 8 जुलै रोजी महात्मा फुले रोडवर सीता स्वयंवर मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कॅनरा बँकेच्या एटीममधून खातेदारांनी एटीएममधुन पैसे काढले. दिवसभरात या एटीएममधून पैसे काढलेल्या खातेदारांच्या खात्यातून रविवार दि. 12 रोजी बेळगावसह बंगळूर व हुबळी येथील एटीएमधून पैसे काढल्याचे उघड झाले आहे. रविवारी दिवसभरात 40 हजार रुपये काढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ माजली आहे. पैसे कुठे काढले आहेत, यासाठी खातेदारांनी बँकेत सोमवारी धाव घेतली. पासबुक भरून घेतल्यानंतर मोठ्या शहरात पैसे काढल्याचे निदर्शनास आले.
रेल्वे ओव्हरब्रिजजवळील गोकुळनगर येथे राहणाऱ्या रावसाहेब पुंडलिक मोहिते यांच्या मोबाईलवर रविवारी दोन मेसेज आले. दोन वेळा त्यांच्या बँक खात्यातून दहा - दहा हजार रुपये काढल्याचा उल्लेख त्या मेसेजमध्ये होता. आपण तर पैसे काढले नाहीत, असे असताना बँकेकडून असा मेसेज का आला ? असा प्रश्न त्यांना पडला. सोमवारी त्यांनी टिळकवाडी येथील महाराष्ट्र बँकेत जाऊन चौकशी केली. आपण कोणाला पासवर्ड दिला नाही तरीही आपल्या खात्यातील 20 हजार रुपये कसे गायब झाले ? अशी विचारणा केली. बसवण कुडची येथील आकाश हिंडलगेकर या तरुणाच्या बँक खात्यातून 20 हजार रुपये काढण्यात आले आहेत. फोर्ट रोडवरील एका कारखानदाराच्या बँक खात्यातून 40 हजार रुपये हडप करण्यात आले आहेत. रविवारीच सुमारे 7 ते 8 जणांच्या खात्यांतून 3 लाखाहून अधिक रक्कम गायब करण्यात आली आहे. यासंबंधी सीईएन सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.
यापूर्वी खरेदीच्या माध्यमातून खातेदारांची लूट होत होती. खातेदारांना फोन करून एटीएमवरचा नंबर विचारुन आपण बँकेमधून बोलत आहोत असे सांगून आपल्या फोनवर आलेला ओटीपी नंबर मागण्यात येत होता. एटीएम व ओटीपी नंबर घेताना तो बरोबर आहे का? याची खातरजमा करण्यात येत होती. त्यानंतर काही मिनिटांत खात्यातील रक्‍कम गायब होत होती. चौकशीनंतर ओटीपी नंबरच्या साह्याने खरेदी केल्याचे उघड होत होते. त्यामुळे आरोपी जाळ्यात अडकत नसत. आता खातेदारांचे बनावट एटीएम बनवून पैसे लांबवल्याचा संशय आहे.


belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ना SMS ना Call तरीही बँकेतील लाखो रुपये लांबवले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm