बेळगावचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह

बेळगावचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोनाच्या संकटात विकासकामाचा धडाडा सुरु असताना तसेच कंटेनमेंट झोनमध्ये सेवा करण्यामध्ये सक्रिय असलेले बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अँड अनिल बेनके यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची शक्यता आहे. अधिकृत कोरोना रिपोर्ट प्रसिद्ध झालेला नाही. बेळगावमध्ये कोरोना संक्रमीत भागास ते सतत भेटी देत होते. तसेच लाॅकडाऊनमध्ये अनेक जनतेची कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांनी कोविड-19 चाचणी केली होती. आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे.

आमदार अनिल बेनके यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने ते घरातच विलगीकरण कक्षात आहेत. (Quarantine)
Latest Update : आमदारांनी त्यांच्या अधिकृृत फेसबुक पेजवर याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्याने ते घरीच क्वारंटाईन आहेत. काल (13 जुलै) जन्मदिनीही कुणाच्या संपर्कात नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शुक्रवारपासून (10 जुलै) त्यांची तब्येत बिघडली होती.
ताप व इतर कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. रविवारी रात्री कोरोना स्वॅब तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर कोरोनाची लक्षणे असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी जनसंपर्क टाळला आहे. एका अज्ञात ठिकाणी क्वारंटाईन झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आपण सुरक्षित व आरोग्याने ठणठणीत आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm