ऑलराउंडर रविंद्र जडेजाची पत्नी झाली आमदार;

ऑलराउंडर रविंद्र जडेजाची पत्नी झाली आमदार;

belgavkar.com | belgaum | belgavkar

पत्नी रिवाबा झाली 'आमदार', क्रिकेटनंतर रवींद्र जडेजाही घेणार भाजपचा झेंडा?

विद्यमान आमदाराचा पत्ता कट करून दिले होते तिकीट

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा दणदणीत असा विजय मिळवला आहे. भारतीय संघातील स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा देखील निवडणुकीच्या रिंगणात होती. रिवाबा जडेजाने भाजपकडून जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. गुरुवारी झालेल्या मतमोजणीत रिवाबाने काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांचा 40963 इतक्या मोठ्या मत फरकाने पराभव केला. या मतदारसंघात 65.5 टक्के मतदान झाले होते.
रिवाबा हा भाजपमध्ये येण्याआधी करणी सेनेचे सदस्य होत्या. 2018 साली त्या करणी सेनेच्या महिला विंगच्या अध्यक्ष होत्या. रिवाबा यांना यांना तिकीट देण्यासाठी भाजपने आमदार धर्मेंद्रसिंह एम जडेजा यांचे तिकीट कापले होते. या विजयानंतर पक्षाचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. क्रिकेटपटू जडेजाची पत्नी असलेल्या रिवाबाने 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा रिवाबा आणि रविंद्र जडेजा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा फोटो देखील व्हायरल झाला होता. भाजपमध्ये दाखल होताच त्या जामनगर उत्तर या मतदारसंघातून सक्रीय झाल्या होत्या. त्यांनी या मतदारसंघात महिलांसाठी फार काम केले आहे.
रिवाबा आणि रविंद्र यांचा विवाह 2016 साली झाला होता. 1990 साली राजकोट येथे जन्मलेल्या रिवाबाचे वडील गुजरातमधील मोठे उद्योगपती आहेत. रविंद्र जडेजा यांची पत्नी नैना या जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष आहेत.
जडेजाने राजकारणात येण्याचे दिले होते संकेत 
आता रवींद्र जडेजा देखील पत्नी विधानसभेत पोहोचल्यानंतर लवकरात लवकर आपली राजकीय खेळी सुरू करू शकतो. पत्नी रिवाबा यांचा उमेदवारी अर्ज भरताना पत्रकारांशी बोलताना खुद्द रवींद्र जडेजाने राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. मला अजून 4 ते 5 वर्षे क्रिकेट खेळायचे आहे, त्यानंतर मी राजकारणातही उतरेन, असे जडेजा म्हणाला होता. रिवाबा यांची ही निवडणूक फार चर्चेत आली होती कारण त्यांना कुटुंबातीलच विरोधाचा सामना करावा लागला. पती रवींद्र जडेजा त्यांच्यासोबत निश्चितच होता, पण वहिणी नयना स्वत: या जागेवरून काँग्रेसचे तिकीट मागत होत्या. सासरे आणि वहिनी दोघेही त्यांच्या विरोधात प्रचार करत होते. मात्र अखेर रिवाबा यांनी आमदार होण्याचा मान मिळवला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

ऑलराउंडर रविंद्र जडेजाची पत्नी झाली आमदार;
पत्नी रिवाबा झाली 'आमदार', क्रिकेटनंतर रवींद्र जडेजाही घेणार भाजपचा झेंडा?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm