belgaum-बेळगाव-belgaum-attacks-on-devotees-are-just-rumours-sp-sanjeev-patil-saundatti-yallamma-temple-belgavkar-belgaum-20221202.jpg | बेळगाव : भाविकांवर हल्ला या केवळ अफवा : एसपी संजीव पाटील | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : भाविकांवर हल्ला या केवळ अफवा : एसपी संजीव पाटील

belgavkar.com | belgaum | belgavkar

शाकंभरी यात्रेनिमित्त सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर लाखोंची गर्दी

बेळगाव : वर्षातील सर्वांत मोठी यात्रा असणाऱ्या शाकंभरी यात्रेनिमित्त सौंदत्ती डोंगरावर दाखल झालेल्या भक्तांना कन्नड संघटनांकडून त्रास होईल, अशी धास्ती कर्नाटक पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी डोंगरावर रेणुका भक्तांची काळजी घेतल्याचे चित्र सौंदत्ती डोंगरावर पाहावयास मिळाले. मात्र, देवीचा जयजयकार करीत दिवसभरात दोन लाखांहून अधिक भक्तांनी देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. सौंदत्ती येथील रेणुका देवी देवदर्शनासाठी आलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर हल्ला झाला, या निव्वळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांनी निवेदनात केले आहे.
मंगळवारी बेंगळूरुसह राज्यातील विविध भागांतील कन्नड भाषिकांनी येथे येऊन गोंधळ घातला. बेळगावची शांतता बिघडवत महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांवर हल्ले केले. सौंदत्तीत आलेल्या भाविकांवरही हल्ला झाल्याची चर्चा होती. यासंदर्भात पाटील यांनी म्हटले आहे, की या स्वरूपाचा कोणताही हल्ला किंवा दहशत सौंदत्तीमध्ये नाही. पोलिस सुरक्षा व्यवस्था असून, खबरदारी घेतली जात आहे. गोकाक आणि गोडचीनमलकी पर्यटन स्थळावरही पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. तेथेही गोंधळ वा तणाव नाही. सौंदत्ती आणि गोकाकला मी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.