संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचं लक्षं लागून असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, गुजरातमध्ये भाजपाने निर्विवाद आघाडी घेतली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. एकूण 68 जागा असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपामध्ये एकेका जागेसाठी लढाई सुरू आहे. दरम्यान, सध्याच्या कलांनुसार दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सध्या मतमोजणीत आघाडीवर असलेले तीन अपक्ष उमेदवार किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीमध्ये पहिल्या दोन तासांनंतर समोर येत असलेल्या कलांमध्ये एकूण 68 जागांपैकी 30 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेसने 33 जागांवर आघाडी घेतली आहे. तर 5 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशमधील डेहरा, नालागड आणि हमिरपूरम मतदार संघातून अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. डेहरामधून होशियार सिंह, नालागडमधून के. एल. ठाकूर आणि हमिरपूरमधून आशिष शर्मा आघाडीवर आहेत. हे तीनही अपक्ष उमेदवार हे भाजपामधील बंडखोर असल्याची माहिती समोर येत आहे.
2017 च्या निवडणुकीत भाजपाने 44 जागा जिंकत स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला होता. मात्र दर 5 वर्षांनी सत्तांतराची परंपरा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. भाजपामधील सुमारे 22 नेत्यांनी बंडखोरी करून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. त्यापैकी हे 3 उमेदवार आता मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे आता त्रिशंकू निकाल लागल्यास हे अपक्ष उमेदवार जिंकून आल्यानंतर कुणाला पाठिंबा देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- बेळगाव : तंगडी गावाजवळ दुचाकी-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार
- विराटचा फोन हरवल्यावर ट्वीटरवर भन्नाट रिस्पॉन्स.. 'नथिंग' म्हणतं आम्ही देतो नवा फोन..
- स्मृती इराणींची मुलगी बांधणार लग्नगाठ; 500 वर्ष जुन्या किल्ल्यामध्ये पार पडणार लग्नसोहळा
- 'त्यांनी' मोठं षडयंत्र रचून पराभव केला; भाजपचा माजी मुख्यमंत्र्यांवर पलटवार @कर्नाटक