एका मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला

एका मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला

belgavkar.com | belgaum | belgavkar

राजस्थानात भाजपा-काँग्रेसमध्ये वाक् युद्ध, राजीनामा मागितला

राजस्थानमधील गेहलोत सरकारमधील एका मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ

राजस्थानमधील गेहलोत सरकारमधील एका मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर राजस्थानमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या व्हिडिओ प्रकरणात राजस्थानच्या अल्पसंख्याक मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपने केला आहे, राजस्थान भाजपने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. तसेच मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. तरुणांनी तिचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर ब्लॅकमेलिंगमुळे मानसिक त्रास होत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
दुसरीकडे राजस्थान भाजपने मंत्री शाले मोहम्मद (Minority Affairs Minister Saleh Mohammad) यांचा व्हायरल व्हिडिओ ट्विट करून गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'अशोक गेहलोत जी, तुमच्या मंत्र्याचा महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, तुम्ही मंत्री शाले मोहम्मद यांना हटवणार की व्होट बँकेच्या लालसेपोटी त्यांना सोडणार?, असं यात म्हटले आहे.  या व्हिडिओ वरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसकडून याबाबत अजुनही प्रतिक्रिया आलेली नाही. या व्हिडिओवरुन गेहलोत सरकारचे रुप समोर आल्याचा आरोप भाजप नेते लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी केला आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

एका मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला
राजस्थानात भाजपा-काँग्रेसमध्ये वाक् युद्ध, राजीनामा मागितला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm