बेळगाव : अट्टल चोरट्यास जेरबंद

बेळगाव : अट्टल चोरट्यास जेरबंद

belgavkar.com | belgaum | belgavkar

आणखी तीन घरात चोरीची कबुली दिली

बेळगाव-संकेश्वर : संकेश्वर येथील पोलिसांकडून अट्टल चोरट्यास जेरबंद केले. महादेव मारुती मुन्नोळी (वय 47, रा. गोकाक) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत डॉ. दीपक भूपाल बाळकाई यांनी फिर्याद दिली होती. अधिक माहिती अशी, हेब्बाळ (ता. हुक्केरी) येथील डॉ. दीपक भूपाल बाळेकाई यांच्या संकेश्वर येथील हौसिंग कॉलनीतील भाडोत्री घरात 5 डिसेंबर रोजी रात्री चोरी झाली होती.
चोरट्यांनी टीव्ही सेट टॉपबॉक्स, दोन बॅगा, 4650 रुपये रोकड असे एकूण 32900 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. फिर्यादीनुसार पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्त्रगेरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती करून तपास चालविला होता. चौकशीअंती महादेव मुन्नोळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 85 ग्रॅम सोने, 4500 रुपये रोकड व दुचाकी जप्त केली. आरोपी बाळकाई याने आणखी तीन घरात चोरीची कबुली दिली आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडी दिली.
गोकाकचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगेरी, पोलिस उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली बी. के. नांगनुरी, आय. जी. आलगत्ती, बी. व्ही. हुलकुंद, मेहबुब दादामलीक, जी. टी. पाटील, एम. एम. जंबगी, बी. एस. करगुप्पी, महेश करगुप्पी, याशीन नदाफ यांनी मोहीमेत भाग घेतला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अट्टल चोरट्यास जेरबंद
आणखी तीन घरात चोरीची कबुली दिली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm