बेळगाव : तिसऱ्या रेल्वेगेटजवळ दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉकर ठार

बेळगाव : तिसऱ्या रेल्वेगेटजवळ दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉकर ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पहाटे फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉकर) गेलेल्या एका व्यक्तीला दुचाकीने धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. नागेंद्र भीमराव काकतकर (वय 52, मूळचे रा. गुंडोळी-हल्ल्याळ, सध्या रा. मजगाव) असे त्यांचे नाव आहे. नागेंद्र हे एक उद्योजक आहेत. रोजच्याप्रमाणे ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये नागेंद्र हे गंभीर जखमी झाले.
इतरांनी त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती दक्षिण रहदारी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेंद्र यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, मुलगी, जावई, असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तिसऱ्या रेल्वेगेटजवळ दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉकर ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm