Youtuber तरुणींचं कांड..! हनीट्रॅपमध्ये अडकवून व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; आता...

Youtuber तरुणींचं कांड...!
हनीट्रॅपमध्ये अडकवून व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा;
आता...

belgavkar.com | belgaum | belgavkar

सौंदर्याचा हनिट्रॅप, बिझनेसमनकडून लाखो उकळले, अखेर अशी अडकली प्रसिद्ध यूट्युबर

प्रेमांचं जाळं, हनीट्रॅप आणि कट;
व्यावसायिकाकडून 80 लाख लुबाडणाऱ्या 6 लाख सबस्क्रायबर असलेल्या महिला YouTuber ला Sextortion प्रकरणात अटक

दिल्लीच्या सुप्रसिद्ध युट्यूबर तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. एका कंपनीच्या मालकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून 80 लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप युट्यूबवर तरुणीवर आहे. त्याचबरोबर व्यावसायिकाला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही युट्यूबवर तरुणीवर आहे. नम्रा कादिर असं या युट्यूबर तरुणीचे नाव आहे. नम्राने गुन्हा मान्य केला आहे. सोमवारी दिल्लीतून नम्रा कादिरला अटक करण्यात आली होती. कोर्टात हजर केल्यानंतर तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, फरार असलेल्या नम्रा कादिरचा पती आणि सहआरोपी मनीष उर्फ विराट बेनीवाल याला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. 22 वर्षीय नम्रा कादिरचे युट्यूबवर 6 लाखांहून अधिक सब्सक्राईबर्स आहेत. बादशाहपूर येथील रहिवासी दिनेश यादव (21) याने ऑगस्टमध्येच तक्रार दाखल केली होती, परंतु या जोडप्याने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली, अशी माहिती गुरुगुग्राम पोलिसांनी दिली. या प्रकरणी अंतरिम जामीन रद्द झाल्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी सेक्टर-50 पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. कादिर आणि बेनीवाल हे दिल्लीच्या शालिमार बागचे रहिवासी आहेत.
सेक्टर-50 पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले की, नम्राने गुन्हा कबूल केला आहे. तसेच पीडित व्यक्तीकडून घेतलेले पैसे आणि इतर साहित्य जप्त करण्यासाठी आम्ही नम्राला पोलिस रिमांडवर घेतले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Youtuber तरुणींचं कांड..! हनीट्रॅपमध्ये अडकवून व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; आता...
सौंदर्याचा हनिट्रॅप, बिझनेसमनकडून लाखो उकळले, अखेर अशी अडकली प्रसिद्ध यूट्युबर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm