भारताने घेतला कठोर निर्णय, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वर्ल्डकपसाठी व्हिसा नाकारला...

भारताने घेतला कठोर निर्णय, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वर्ल्डकपसाठी व्हिसा नाकारला...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बीसीसीआयने जर आपला संघ जर पाकिस्तानमध्ये आशिया चषक खेळायला पाठवला नाही, तर आम्ही भारतात वर्ल्डकप खेळायला येणार नाही, असे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी ठणकावून सांगितले होते. पण आता भारताने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला व्हिसा नाकारल्याचे वृत्त समोर आले आहे. भारतामध्ये 5 ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये अंध क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी पाकिस्तान अंध क्रिकेट परिषदेने (PBCC) या स्पर्धेत खेळण्यासाठी भारताकडे व्हिसा देण्याची विनंती केली होती. पण या व्हिसाला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मंजुरी मिळू शकली नाही. अंध क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या अंध क्रिकेट संघाला भारतात जाण्यासाठी व्हिसा नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ अंध क्रिकेट विश्वचषक खेळणार की व्हिसा न मिळाल्यामुळे त्यांना सहभागी होता येणार नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
भारतामध्ये पुढच्या वर्षी वनडे क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकात आपण सहभागी होणार नसल्याची धमकी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने दिली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताचे हे कडक पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. कारण विश्वचषकात खेळण्याची संधी न मिळणे, यासारखी मोठी गोष्ट कोणतीही नसते. त्यामुळे पाकिस्तानचा संघ जरी आम्ही विश्वचषकात खेळणार नसल्याची धमकी देत असला तरी त्यांना या स्पर्धेत खेळायचे आहे, हे निश्चित. पण पाकिस्तानमधील क्रिकेटला चालना मिळण्यासाठी भारताचे मोठे योगदान ठरू शकते. त्यासाठी पाकिस्तान भारतीय संघाला आपल्या देशात खेळण्याची गळ घालत आहे. पण यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतील हे पाहावे लागेल.
“या दुर्दैवी घटनेने पाकिस्तानचा अंध क्रिकेट संघ हादरून गेला आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तान आणि भारत यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता होती आणि सध्याचा फॉर्म लक्षात घेता पाकिस्तानला विश्वचषक जिंकण्याची दाट शक्यता आहे, ”पीबीसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. पीबीसीसीने पुढे म्हटले आहे की, “भारताच्या या भेदभाव करणार्‍या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो. कारण खेळ प्रादेशिक राजकारणापेक्षा वरचढ असले पाहिजेत. आमच्या भारतातील अंध क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या सरकारकडे पाकिस्तानच्या मंजुरीसाठी विनंती केली परंतु काहीही ऐकले नाही. या भेदभाव करणार्‍या कृतीचे जागतिक अंध क्रिकेटवर गंभीर परिणाम होतील. कारण जागतिक अंध क्रिकेटमध्ये आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू आणि भारताला भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करू देणार नाही.”
क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाने (CABI) या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, पाकिस्तान संघ सहभागी होत नसल्याने ते स्पर्धेचे अद्ययावत वेळापत्रक जारी करेल. CABI ने त्यांच्या व्हिसा अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भारताने घेतला कठोर निर्णय, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वर्ल्डकपसाठी व्हिसा नाकारला...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm