MCD Exit Poll : ‘आप’ली दिल्ली...! महापालिका निवडणुकीत ‘आप’चा वरचष्मा; भाजपाला धक्का, काँग्रेस नगण्य

MCD Exit Poll : ‘आप’ली दिल्ली...!
महापालिका निवडणुकीत ‘आप’चा वरचष्मा;
भाजपाला धक्का, काँग्रेस नगण्य

belgavkar.com | belgaum | belgavkar

दिल्ली महापालिका निवडणुकीचा एक्झिट पोल

आम आदमी पार्टीने भाजपासह काँग्रेसला जोरदार धक्का दिल्याचं चित्र

रविवारी 4 डिसेंबर रोजी दिल्ली महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत 50.47 टक्के मतदान झालं आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत 250 प्रभागांमध्ये एकूण 1349 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या सर्व उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये कैद झालं आहे. या निवडणुकीचा निकाल 7 डिसेंबरला लागणार आहे. तत्पूर्वी, या निवडणुकीचा एक्झीट पोल समोर आला असून आम आदमी पार्टीने भाजपासह काँग्रेसला जोरदार धक्का दिल्याचं चित्र आहे.
‘इंडिया टुडे’साठी ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला 43 टक्के मतदान झालं असून 149 ते 171 जागांवर ‘आप’चा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्ली महापालिकेची एकहाती सत्ता आम आदमी पार्टीकडे जाण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत भाजपाला 35 टक्के मतदान झालं असून 69 ते 91 जागांवर भाजपा विजयी होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाने आपला मतदार कायम राखला आहे. मात्र, दिल्लीत काँग्रेसचं प्रचंड नुकसान झाल्याचं चित्र आहे. काँग्रेसला 10 टक्के मतदान झालं असून 3 ते 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

MCD Exit Poll : ‘आप’ली दिल्ली...! महापालिका निवडणुकीत ‘आप’चा वरचष्मा; भाजपाला धक्का, काँग्रेस नगण्य
दिल्ली महापालिका निवडणुकीचा एक्झिट पोल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm