IND vs BAN : दुष्काळात तेरावा महिना...! बांगलादेशने टीम इंडियाची जीरवली अन् आता रोहित & टीमच्या खिशाला कात्री

IND vs BAN : दुष्काळात तेरावा महिना...!
बांगलादेशने टीम इंडियाची जीरवली अन् आता रोहित & टीमच्या खिशाला कात्री

belgavkar.com | belgaum | belgavkar

India vs Bangladesh 1st ODI : भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.

भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला.186 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची अवस्था 9 बाद 136 धावा अशी झाली होती. आता सामना भारताचाच असे वाटले होते, परंतु मेहिदी हसनने अखेरच्या विकेटसोबत खिंड लढवली. मेहिदी व मुश्ताफिजूर यांनी दहाव्या विकेटसाठी वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी करताना बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने 1 विकेट राखून सामना जिंकला. 

भारतीय संघाची 80 टक्के मॅच फी कापली
पहिल्या वन डे सामन्यात भारताने षटकांचा वेग संथ राखला आणि निर्धारीत वेळेत षटकं पूर्ण न केल्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर कारवाई केली. आयसीसीच्या मॅच रेफरीच्या एलिट पॅनलमधील रंजन मदुगाले यांनी या निर्णय घेतला. निर्धारित वेळेपेक्षा भारतीय संघ 4 षटकं मागे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आणि आर्टिकल 2.22 नुसार भारताला 80 टक्के मॅच फी दंड म्हणून भरावी लागणार आहे.  
शाकिब अल हसनने भारतीय फलंदाजांना नाक घासायला भाग पाडले. शाकिबची (5-36) कामगिरी ही भारताविरूद्ध वन डे क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी ठरली. इबादत होसैनने 4 विकेट्स घेतल्या आणि भारताचा डाव 186 धावांवर गुंडाळला. भारताकडून लोकेश राहुलने 70 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह 73 धावा केल्या. प्रत्युत्तरात लिटन दास (41) वगळता आघाडीच्या फलंदाजांनी माना टाकल्या. 9 बाद 136 धावांवरून बांगलादेशचे पुनरागमन अशक्यच होते, परंतु मेहिदी हसन (38*) आणि मुस्ताफिजूर रहमना  (10*) यांनी 51 धावांची विक्रमी भागीदारी केली.  

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

IND vs BAN : दुष्काळात तेरावा महिना...! बांगलादेशने टीम इंडियाची जीरवली अन् आता रोहित & टीमच्या खिशाला कात्री

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm