बेळगाव : मालवाहू ट्रकचे नियंत्रित सुटल्याने आणि ट्रकने पुलावरील युवकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवक पुलाखाली कोसळल्याने जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील राकसकोप जवळील सोनोलीजवळ घडली आहे. आज सकाळी बेळगाव तालुक्यातील राकसकोप जवळील सोनोली येथे लाकडाचा भुसा वाहतूक करणार्या मालवाहू ट्रकवरील नियंत्रण सुटले ट्रक आणि ट्रक पुलाखाली कोसळला. अपघातात पुलावर थांबलेल्या युवकाला ट्रकची धडक बसल्याने त्याचा पुलावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. दिग्नेश झंगरुचे (वय 17, रा. सोनोली) असे मृताचे नाव आहे.
सोनोलीतल युवक राकसकोप जवळून जात होता. समोरून येणाऱ्या ट्रकला रस्ता देण्यासाठी तो पुलावर थांबला. परंतु भरधाव आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने युवक पुलाखाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. अपघाताबाबत गुन्हा दाखल झाला आहे.