बेळगाव : यंदा 37 कोटी रुपयांचा चुराडा होणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

19 ते 29 डिसेंबर याकाळात 11 दिवस अधिवेशन

बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर यंदा 37 कोटी रुपयांचा चुराडा होणार असल्याचे राज्य शासनाच्या प्राथमिक कृती आराखड्यातून समोर आले आहे. येत्या 19 ते 29 डिसेंबर याकाळात 11 दिवस अधिवेशन होईल. त्यापैकी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस वगळल्यास नऊ दिवस कामकाज चालण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी तब्बल 37 कोटी रुपये खर्चाचे नियोजन केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2019 व 2020 मध्ये बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन झाले नाही. मात्र, 2021-22 मध्ये बेळगावात झालेल्या अधिवेशनासाठी 18 कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, यंदाच्या अधिवेशनावर त्यापेक्षा दुप्पट रक्कमेचा चुराडा केली जाण्याची शक्यता आहे.
बेळगावात 2013 मध्ये विधीमंडळाचे पहिले अधिवेशन झाले. त्यावेळी 8 कोटी रुपये अधिवेशनावर खर्च करण्यात आले. त्यानंतर 2014 मध्ये 14 कोटी, 2015 मध्ये 15 कोटी, 2016 मध्ये 16 कोटी, 2017 मध्ये 31 कोटी व 2018 मध्ये 13.85 कोटी रुपये अधिवेशनावर खर्च झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यानंतर दोन वर्षे बेळगावात अधिवेशन झाले नाही. 2019 मध्ये बेळगावसह उत्तर कर्नाटकात झालेली अतिवृष्टी आणि महापूर या कारणामुळे अधिवेशन रद्द करण्यात आले; तर 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने अधिवेशन झाले नाही. गेल्यावर्षी 2021 मध्ये अधिवेशनावर 18 कोटीहून अधिक रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, यंदा त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, अधिवेशनासाठी सुमारे 37 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : यंदा 37 कोटी रुपयांचा चुराडा होणार
19 ते 29 डिसेंबर याकाळात 11 दिवस अधिवेशन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm