बेळगाव : गांधीनगरनजीक नव्या भाजीमार्केटजवळ झालेल्या अपघातात काकती येथील वृद्ध महिला जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भरधाव कॅन्टरची थांबलेल्या पिकअप वाहनाला पाठीमागून धडक बसल्याने गांधीनगरनजीक नव्या भाजीमार्केटजवळ झालेल्या अपघातात काकती येथील वृद्धा जागीच ठार झाली तर पिकअप चालकासह दोघे जण जखमी झाले. शनिवारी सायंकाळी 7.39 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, नव्या भाजीमार्केटला भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वृद्धेवर काळाने घाला घातला आहे. भवानी गौडर (वय 60, रा. सिद्धेश्वरनगर, काकती) असे त्या दुर्दैवी वृद्धेचे नाव आहे.
पिकअपमधून उतरताना कॅन्टरने ठोकरल्याने भवानी जागीच ठार झाल्या. अपघातात कमलव्वा तिरगू (वय 44, रा. न्यू वंटमुरी), पिकअप चालक परशराम चंडकी (वय 36, रा. गोडीहाळ) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा, उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी व त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भवानी व कमलव्वा या पिकअपमधून भाजीमार्केटला आल्या होत्या. रस्त्याशेजारी उभारलेल्या वाहनांतून उतरताना कॅन्टरची पाठीमागून धडक बसून हा अपघात घडला. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : गांधीनगरनजीक नव्या भाजीमार्केटजवळ झालेल्या अपघातात काकती येथील वृद्ध महिला जागीच ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm