मस्तच....! आता WhatsApp वर सहज रेकॉर्ड करता येणार Video कॉल; कसं?

मस्तच....!
आता WhatsApp वर सहज रेकॉर्ड करता येणार Video कॉल;
कसं?

belgavkar.com | belgaum | belgavkar

WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. WhatsApp च्या माध्यमातून युजर्स केवळ मेसेजच पाठवू शकत नाहीत तर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही करू शकतात. मात्र युजर्स व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहज WhatsApp कॉल रेकॉर्ड करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या अँड्रॉईड किंवा आयफोन या दोन्ही उपकरणांमध्ये WhatsApp व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता. WhatsApp व्हिडिओ कॉल डाऊनलोड करण्यासाठी, तुम्हाला फक्त XRecorder हे एप डाऊनलोड करावे लागणार आहे. WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
अँड्रॉईड युजर्स असा रेकॉर्ड करू शकतात व्हिडीओ कॉल
सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉईड फोनवर गुगल प्ले स्टोअर ओपन करा. यानंतर येथे XRecorder अ‍ॅप डाऊनलोड करा. यानंतर, आवश्यक परमीशन देऊन पुढे जा. आता तुम्हाला स्क्रीनवर रेकॉर्डिंगचा पर्याय मिळेल. येथून तुम्ही व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करू शकता.
आयफोनवर असा रेकॉर्ड करू शकतात व्हिडीओ कॉल
सर्वप्रथम, ज्या युजर्सचा कॉल तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे, त्याला WhatsApp वर व्हिडीओ कॉल करा, त्यानंतर तळाशी असलेले स्वाइप बटण दाबा. येथे सेटिंगमध्ये जाऊन 'कंट्रोल सेंटर' वर जा. येथे तुम्हाला तुमची स्क्रीन रेकॉर्ड करण्याचा पर्याय दिसेल. आता त्यावर क्लिक करा. तुम्ही त्यावर क्लिक करताच, तुमच्या डिव्हाइसवर WhatsApp कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मस्तच....! आता WhatsApp वर सहज रेकॉर्ड करता येणार Video कॉल; कसं?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm