बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर झेंडा बदलण्यासाठी प्रयत्न

बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर झेंडा बदलण्यासाठी प्रयत्न

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर अनधिकृतरित्या लावलेल्या ध्वजस्तंभावरील लाल पिवळा झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पोलिसांनी रोखले. तेथील जुना झेंडा काढून नवा झेंडा लावण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. यामुळे महापालिका कार्यालयाच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला.
डिसेंबर 2020 मध्ये श्रीनिवास ताळूकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महापालिकेसमोर अनधिकृत ध्वजस्तंभ उभारुन त्यावर लाल-पिवळा झेंडा फडकविला. मराठी भाषिकांनी, महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेकदा मागणी करुनही तो ध्वजस्तंभ व झेंडा प्रशासनाने हटविलेला नाही. गतवर्षी ताळूकर याने कर्नाटक राज्योत्सवाच्या आधी झेंडा बदलण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळीही पोलिसांनी रोखले होते, पण महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या मदतीने रात्री झेंडा बदलला होता. त्याला मराठी भाषिकांनी आक्षेप घेतला. शिवाय रात्री झेंडा बदलण्याच्या प्रकारावर टीकाही झाली होती.
यंदाही राज्योत्सवाच्या आधी तेथील झेंडा बदलण्याचा प्रयत्न होता. याची कुणकुण पोलिसांनी लागताच गुरुवारी सकाळपासूनच मार्केट पोलीस ठाण्याचे पथक महापालिका कार्यालयासमोर तैनात केले. ताळूकर व त्यांचे सहकारी झेंडा बदलण्यासाठी गेले, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. महापालिकेसमोर लाल-पिवळा झेंडा लावण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, पण मराठी भाषिकांनी तो हाणून पाडला होता. रिसालदार गल्लीतील पालिकेच्या जुन्या कार्यालयावर भगवा झेंडा फडकविला जातो, तो झेंडा मार्च, 2009 मध्ये हटविला. शासनाच्या आदेश नसतानाही न्यायालयात केवळ प्रतिज्ञापत्र सादर करून भगवा हटविला. एवढेच नव्हे तर झेंड्यासाठी महापालिकेचे कार्यालय बदलले. सुभाषनगर येथील नव्या इमारतीत 2009 ला पालिकेच्या कार्यालयाचे स्थलांतर केले. नव्या इमारतीवर लाल-पिवळा झेंडा लावण्याची मागणी झाली, पण प्रशासनाकडून त्याबाबत कार्यवाही झाली नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर झेंडा बदलण्यासाठी प्रयत्न

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm