बेळगाव : बेळगाव शहरातील आणखी एका रस्त्याला आता मुख्यमंत्र्यांचे नाव

बेळगाव : बेळगाव शहरातील आणखी एका रस्त्याला आता मुख्यमंत्र्यांचे नाव

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नाव देण्याची तयारी सुरू

बेळगाव : बेळगाव शहरातील आणखी एका रस्त्याचे आता नामकरण करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आरपीडी चौक (टिळकवाडी) आणि जुना धारवाड रोडच्या नामकरणानंतर आता बेम्को क्रॉस-केएलई इंजिनिअरिंग कॉलेज रस्ता ते तिसऱ्या रेल्वे फाटकापर्यंतच्या रस्त्याला कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नाव देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. बेळगाव महापालिकेकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
उद्यमबाग येथील बेम्को क्रॉस ते केएलई इंजिनिअरिंग कॉलेज मार्ग बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. या मार्गांच्या नामकरणासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नाव रस्त्याला देण्याचा प्रस्ताव बेळगाव महापालिकेने तयार केला असून यासंदर्भात आक्षेपासह लेखी तक्रारी मांडण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीस दिवसांत योग्य सूचना व हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेळगाव शहरातील आणखी एका रस्त्याला आता मुख्यमंत्र्यांचे नाव
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे नाव देण्याची तयारी सुरू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm