बेळगाव रिंगरोडसाठी प्रसिद्ध केलेले सर्व्हे क्रमांक

belgavkar.com | belgaum | belgavkar

पुन्हा 69 कि.मी. रिंगरोडसाठी 31 गावांमधील हजारो एकर जमीन जाणार

21 दिवसांच्या आत शेतकर्‍यांनी आपले म्हणणे मांडावे लागणर

बेळगाव : बेळगाव शहराभोवती रिंगरोड होणार आहे. बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर परत एकदा रिंगरोडसाठी भूसंपादनाची टांगती तलवार लटकली आहे. 21 दिवसांच्या आत शेतकर्‍यांनी आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. जमिनीबरोबरच काही जणांच्या इमारतीही जाणार आहेत. हा रस्ता 69.387 कि.मी.चा होणार आहे. शहराला लागून असलेल्या गावांतून हा रस्ता चार ते सहापदरी करणार असल्याचे या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची हजारो एकर जमीन या रस्त्यामध्ये जाणार आहे.
या रिंगरोडमध्ये
अगसगा येथील सर्व्हे क्रमांक 148, 149, 151, 156, 157, 158, 159, 160, 161, 163, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 27, 28

आंबेवाडी : सर्व्हे क्रमांक 65, 66, 67, 68, 69, 71

बाची : सर्व्हे क्रमांक 10, 101, 11, 13, 15, 16, 17, 18, 23, 26, 27, 28, 29, 31, 8, 9
ring-road-belgaum
बहाद्दरवाडी : सर्व्हे क्रमांक 32, 62, 64, 65-ए, 68, 69, 71, 72-ए, 72-बी
बेळगुंदी : 135, 136, 145, 146, 147, 148, 149, 189, 190, 191, 209, 210, 211, 254, 255, 256, 261, 262, 263, 264, 268, 269, 270, 274, 275, 303-ए, 304, 307, 308, 310, 311, 312, 315, 316, 326, 327, 332, 376

बिजगर्णी : सर्व्हे क्रमांक 219, 220, 224, 225, 226, 231, 233, 272, 273, 274, 275, 276, 287, 291, 292, 293, 295, 296, 297, 302, 303

गोजगे : सर्व्हे क्रमांक 10, 127, 134, 135, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145, 16, 17, 18, 20, 21

होनगा : सर्व्हे क्रमांक 269, 270, 271, 272, 273, 274, 275, 315, 318, 320, 321, 322, 323, 347, 348, 349, 350, 351, 352, 353, 354, 355, 356, 357, 358, 359, 360, 361, 362, 363, 364, 365, 366, 367, 368, 369, 370, 371, 372, 373, 374, 381, 382, 383, 384, 406, 407, 408, 409, 440, 441, 442, 444, 445, 446, 447, 448, 449, 450, 451, 452, 453, 454, 455, 457, 458, 460, 462, 463, 464, 465, 466, 488, 489, 499, 500, 501
कडोली : सर्व्हे क्रमांक 10, 107, 108, 11, 110, 112, 117, 118, 119, 12, 120, 121, 129, 13, 21, 22, 24, 25, 27, 28, 29, 32, 545, 546, 548, 549, 570, 571, 581, 582, 583, 584, 585, 587, 588, 589, 590, 591, 592, 593, 597

काकती-सर्व्हे क्रमांक- 176 वनविभाग, 92, 94, 98 वनविभाग

कलखांब : सर्व्हे क्रमांक 10, 19, 20, 207, 208, 209, 21, 210, 211, 212, 213, 214, 215, 23, 24, 25, 7, 8, 9

कल्लेहोळ : सर्व्हे क्रमांक 259, 288, 289, 293, 294, 295, 296, 297, 298, 299, 303 या सर्व्हे क्रमांकामधील जमिनी संदर्भात नोटीफिकेशन देण्यात आले आहे. याचबरोबर खमकारट्टी, कणबर्गी कोंडसकोप्प, मण्णूर, मास्तमर्डी, मुचंडी, मुतगा, नावगे, संतिबस्तवाड, शगमनहट्टी, शिंदोळी, सोनट्टी, सुळगा येळ्ळूर, तमनायकनहट्टी-धामणे, तुरमुरी, उचगाव, वाघवडे, यरमाळ, येळ्ळूर, झाडशहापूर गावाच्या शिवारातील जमिनी या नोटीफिकेशनमध्ये देण्यात आल्या आहेत.
रिंगरोडमध्ये अगसगा, आंबेवाडी, बाची, बहाद्दरवाडी, बिजगर्णी, गोजगे, होनगा, कडोली, काकती, मास्तमर्डी, कलखांब, कल्लेहोळ, कमकारट्टी, कणबर्गी, कोंडसकोप, मास्तमर्डी, मण्णूर, मुचंडी, मुतगा, नावगे, संतिबस्तवाड, शगमनमट्टी, शिंदोळी, सोनट्टी, येळ्ळूर-सुळगा, तमनायकनट्टी-धामणे, तुरमुरी, उचगाव, वाघवडे, यरमाळ, येळ्ळूर, झाडशहापूर या गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी रस्त्यामध्ये जाणार आहेत. या सर्व गावांची नावे नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहेत. यामुळे सर्वच गावांतील सुपीक जमिनी या रस्त्यात जाणार असल्याने शेतकर्‍यांना पुन्हा लढाई लढावी लागणार आहे.
ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर परत एकदा रिंगरोडसाठी भूसंपादनाची टांगती तलवार लटकली आहे. राष्ट्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे आज या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. त्यात 31 गावांमधील 509.7677 हेक्टर (50,97,677 चौरस मीटर) जमीन संपादित करण्यात येणार आहे, असा उल्लेख आहे.

शेतकर्‍यांनी याआधिच उच्च न्यायालयात धाव घेतलीयं. त्याठिकाणी न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र आता पुन्हा नव्याने एका इंग्रजी दैनिकामध्ये रिंगरोडसाठी जमीन घेण्यात येणार असलेल्या गावांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णवर यांनी हे नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.