बेळगाव होणार वैमानिक प्रशिक्षण शहर

बेळगाव होणार वैमानिक प्रशिक्षण शहर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावमध्ये 2 फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनना मंजुरी

बेळगाव : भविष्यात बेळगावची ओळख ही वैमानिक प्रशिक्षण केंद्र अशी होणार आहे. सांबरा येथील एअरमन टेनिंग स्कूलसोबत खासगी 2 फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ-Flight Training Organisations) उभारले जात आहेत. एका एफटीओचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दुसर्‍या एफटीओच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे दोन्ही एफटीओ कार्यरत झाल्यास बेळगावची नवी ओळख निर्माण होणार आहे.
विमानतळांवर उपलब्ध जागेमध्ये खासगी प्रशिक्षण सुरू करण्यासाठी नागरी हवाई उड्डाण खात्यातर्फे योजना आखण्यात आली. बेळगाव विमानतळावर दोन एफटीओंना मंजुरी मिळाली. परंतु कोरोनामुळे काम सुरू होण्यास विलंब झाला. अखेर 2022 मध्ये या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात विमानतळ प्राधिकरणाकडून मुख्य धावपट्टीपासून उभारण्यात येणार्‍या एफटीओपर्यंत टॅक्सी ट्रक तयार करण्यात आला. त्यानंतर एफटीओच्या हँगर उभारणीला सुरुवात झाली.
प्रारंभी रेड बर्ड कंपनीने हँगर उभारणीला सुरुवात केली. 5000 चौरस मीटर जागेमध्ये एफटीओचे बांधकाम करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यापासून बेंगळूर येथील समवर्धने कंपनीनेदेखील एफटीओच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. लवकरच हे दोन्ही एफटीओ कार्यरत होणार आहेत.
काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता
बेळगावमध्ये 2 फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनना मंजुरी मिळाली असल्याने या दोन्ही एफटीओंचे काम प्रगतिपथावर आहे. रेड बर्ड या कंपनीने हँगर उभारणीचे काम पूर्ण केले असून, समवर्धने कंपनीने आता सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव होणार वैमानिक प्रशिक्षण शहर
बेळगावमध्ये 2 फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनना मंजुरी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm