पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता विराट कोहलीचा आशियात डंका;

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता विराट कोहलीचा आशियात डंका;

belgavkar.com | belgaum | belgavkar

'या' बाबतीत नोंदवला मोठा विक्रम

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक 2022 स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी करून 1021 दिवसांचा दुष्काळ संपवला. नोव्हेंबर 2019नंतर विराटला आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यात अपयश आले होते. त्याच्या खेळावर टीका झाली, त्याने कर्णधारपद सोडले, एक-दीड महिना विश्रांती घेतली अन् अखेर 71 वे आंतरराष्ट्रीय शतक आले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 तील हे त्याचे पहिलेच शतक ठरले आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर विराटचा फॉर्म परतल्याने चाहतेही खूश झाले आहेत. त्यात विराटने एक आणखी एक विक्रम नावावर केला आहे. जगात असा पराक्रम करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
विराट कोहलीचे ट्विटरवर 50 मिलियन म्हणजेच 5 कोटींच्यावर फॉलोअर्स झाले आहेत. ट्विटरवर इतके फॉलोअर्स असलेला विराट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. इंस्टाग्रामवरही त्याचे 211 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर फेसबूकवर ही संख्या 49 मिलियन इतकी आहे. सोशल मीडियावर विराटचे एकूण 310 मिलियन फॉलोअर्स आहेत. आशिया चषक 2022 स्पर्धेत विराटने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. पण, भारताला सुपर 4 मध्येच गाशा गुंडाळावा लागला. श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानला लोळवून जेतेपद पटकावले. 
hopperhq ने 2022 मधील इंस्टाग्रामची रिच लिस्ट जारी केली आहे. या ताज्या यादीमध्ये किंग कोहलीने मोठी झेप घेतली आहे. मागील वर्षी कोहली एक इंस्टाग्राम पोस्टसाठी 5 कोटी रूपये घेत होता आणि तो 18 व्या स्थानावर होता. मात्र 2022 च्या ताज्या यादीमध्ये त्याने 4 पाऊलांनी मोठी झेप घेत 14 व्या स्थानावर मजल मारली आहे. क्रिकेट विश्वाबद्दल भाष्य करायचे झाले तर, या यादीत कोहलीचा नंबर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी नंतर येतो. लक्षणीय बाब म्हणजे रोनाल्डो एका पोस्टसाठी 19.71 कोटी रूपये आकारतो, तर मेस्सी एका पोस्टसाठी 14.21 कोटी घेतो.
hopperhq द्वारे जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये भारतीयांमध्ये विराट कोहलीनंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नंबर लागतो. प्रियंका एका पोस्टसाठी 3.38 कोटी रूपये घेते आणि ती या यादीमध्ये 27 व्या क्रमांकावर आहे.  दरम्यान, आशियात सर्वाधिक ट्विटरवर फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रेटिंमध्ये विराट कोहलीच्या पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ट्विटवर त्यांचे 82.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता विराट कोहलीचा आशियात डंका;
'या' बाबतीत नोंदवला मोठा विक्रम

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm