बेळगाव : आता सकाळच्या सत्रातही बेंगळूरला विमानसेवा, बेळगाव-बेंगळूर-बेळगाव

belgavkar.com | belgaum | belgavkar

इंडिगो एअरलाईन्स 30 ऑक्टोबरपासून विमानफेरी सुरू करणार

बेळगाव : सकाळच्या सत्रात बेंगळूरहून बेळगावला विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून इंडिगो एअरलाईन्स 30 ऑक्टोबरपासून बेंगळूर-बेळगाव या मार्गावर विमानफेरी सुरू करणार आहे.
सकाळी 9.20 वा. बेंगळूर येथून निघालेले विमान 10.55 वा. बेळगावला पोहोचणार आहे तर सकाळी 11.15 वा. बेळगाव येथून निघालेले विमान 12.40 वा. बेंगळूर येथे पोहोचेल.
बेंगळूरमधून बेळगावला सकाळच्या सत्रात विमानफेरी उपलब्ध नव्हती. यामुळे प्रवासी तसेच अधिकार्‍यांची गैरसोय होत होती. अनेक प्रशासकीय अधिकारी कामानिमित्त सकाळी बेळगावमध्ये येतात. तसेच बेळगावमधून अनेकजण बेंगळूर येथे कामानिमित्त जात असतात. या सर्वांसाठी सकाळची विमानफेरी महत्त्वाची ठरत होती. दोन दिवसांपूर्वी खासदार मंगला अंगडी यांनी विमानतळाला भेट देऊन सकाळची विमानफेरी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. इंडिगो एअरलाईन्सने विमान सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तिकीट बुकिंगही सुरू केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आता सकाळच्या सत्रातही बेंगळूरला विमानसेवा, बेळगाव-बेंगळूर-बेळगाव
इंडिगो एअरलाईन्स 30 ऑक्टोबरपासून विमानफेरी सुरू करणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm