बेळगाव : वैमानिक प्रशिक्षण केंद्राची लवकरच स्थापना-बेळगावातील सांबरा विमानतळ

बेळगाव : वैमानिक प्रशिक्षण केंद्राची लवकरच स्थापना-बेळगावातील सांबरा विमानतळ

belgavkar.com | belgaum | belgavkar

सहा महिन्यांचे वैमानिक प्रशिक्षण दिले जाणार

बेळगाव : बेळगावातील सांबरा विमानतळ आता महत्त्वाचे विमानतळ ठरत असून लवकरच या ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. दिवंगत खासदार व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांचे हे स्वप्न होते. या केंद्रामध्ये व्यावसायिक वैमानिक परवाना घेऊ इच्छिणार्‍या युवकांना सहा महिन्यांचे वैमानिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
खासदार मंगला अंगडी यांनी गुरुवारी सांबरा येथील विमानतळाला भेट देऊन त्याबाबत अधिकार्‍यांयांशी चर्चा केली. तसेच केंद्र उभारणीच्या कामाची माहिती करून घेतली. बेळगाव-बेंगळूर विमानसेवा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची माहितीही इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकार्‍यांनी दिली. यावेळी विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : वैमानिक प्रशिक्षण केंद्राची लवकरच स्थापना-बेळगावातील सांबरा विमानतळ
सहा महिन्यांचे वैमानिक प्रशिक्षण दिले जाणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm