बेळगाव : बाथरुममध्ये पडल्यामुळे विश्वेश्वरय्यानगर येथील महिलेचा मृत्यू

बेळगाव : बाथरुममध्ये पडल्यामुळे विश्वेश्वरय्यानगर येथील महिलेचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बाथरुममध्ये पडल्यामुळे विश्वेश्वरय्यानगर येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेहा कार्तिक चंद्रा (वय 35, रा विश्वेश्वरय्यानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री अडीज वाजण्याच्या सुमारास बाथरुममध्ये पडून ती जखमी झाली होती. उपचारासाठी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. माञ उपचाराचा उपयोग न होता शनिवारी पहाटे तिचा मृत्यू झाला.
एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. नेहाची आई येला यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून बाथरुममध्ये पडून किंवा विषारी पदार्थाच्या सेवनाने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बाथरुममध्ये पडल्यामुळे विश्वेश्वरय्यानगर येथील महिलेचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm