भारतात कोरोनाचा हाहाकार! 30 मे रोजी उच्चांकी नव्या CoVID-19 रुग्णांची नोंद; देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,82,143 वर

भारतात कोरोनाचा हाहाकार! 30 मे रोजी उच्चांकी नव्या CoVID-19 रुग्णांची नोंद;
देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,82,143 वर

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) ने अक्षरश: धुमाकूळ घातला असून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत चालली आहे. गेल्या 24 तासांत 8380 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,82,143 वर पोहोचली आहे. तसेच काल दिवसभरात 193 रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा 5164 वर पोहोचला आहे.
सद्य घडीला देशात 89,995 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) सांगितले आहे. तसेच यातील 86,984 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून येथील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सद्य घडीला महाराष्ट्रात 65,168 रुग्ण आहेत.
महाराष्ट्र 65,168
तमिळनाडूत 21,184
नवी दिल्ली 18,549
गुजरात 16,343
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने देशात 31 मेपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहेत.
कोरोनाचे संकट पाहता पाचव्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात मेट्रो, शैक्षणिक संस्था, सिनेमागृह बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच राजकीय, समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
Highest spike of 8,380 new #COVID19 cases in the last 24 hours in India, 193 deaths reported. Total number of cases in the country now at 1,82,143 including 89995 active cases, 86984 cured/discharged/migrated and 5164 deaths: Ministry of Health and Family Welfare

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भारतात कोरोनाचा हाहाकार! 30 मे रोजी उच्चांकी नव्या CoVID-19 रुग्णांची नोंद; देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,82,143 वर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm