एयर इंडिया च्या विमानाचा पायलट कोरोना पॉझिटिव्ह; मॉस्को ला जाणारे विमान माघारी - वंदे भारत मिशन

एयर इंडिया च्या विमानाचा पायलट कोरोना पॉझिटिव्ह;
मॉस्को ला जाणारे विमान माघारी - वंदे भारत मिशन

belgavkar.com | belgaum | belgavkar

वंदे भारत मिशन (Vande Bharat Mission) माध्यमातुन दिल्ली (Delhi) वरुन मॉस्को (Moscow)  ला जाणार्‍या विमानाला माघारी बोलावुन घेण्यात आले आहे. या विमानाचा पायलट हा कोरोना पॉझिटिव्ह (CoVID-19) असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर लगेचच हा निर्णय घेण्यात आला. एअर इंडिया (Air India)  चे ए -320 विमान नामक हे विमान मॉस्को मध्ये अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी दिल्ली वरुन सोडण्यात आले होते. यावेळी विमानात प्रवासी नव्हते. या विमानाच्या पायलट टीम मधील एकाची नुकतीच कोरोना चाचणी झाली होती, मात्र त्याचे अहवाल नजर चुकीने निगेटिव्ह असल्याचे ग्राउंडटीम ने सांगितले होते. विमानाचे उड्डाण झाल्यावर दुसरीकडे एअर इंंडियाच्या ग्राउंड टीमला ही चुक लक्षात आली. दुर्दैवाने या पायलटचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह होता. अशा वेळी अन्य टीमच्या सुरक्षेच्या कारणातुन या विमानाचे लॅन्डिंग करण्यात आले.
प्राप्त माहिती नुसार, जेव्हा ग्राउंडटीमला या पायलटचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजले तेव्हा विमान उझबेकिस्तान येथे पोहचले होते. मात्र तिथुन विमान दिल्लीला परत बोलावण्यात आले. विमानाच्या क्रु मेंंबर्सना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमानाचे सुद्धा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. 
सुदैवाने विमानात प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठे संकट टळले आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर दोन तासांमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली. मॉस्कोमध्ये अडकलेल्या भारतीयांना या विमानातून परत आणलं जाणार आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत काम करणाऱ्या प्रत्येत क्रू मेंबरची कोरोना चाचणी करणं सरकारने बंधनकारक कलं आहे.
Air India flight (AI-1945) going to Moscow from Delhi under #VandeBharatMission returns mid-way after pilot's #COVID19 test result came positive. Aircraft under disinfection process at Delhi airport.
Air India flight (AI-1945) going to Moscow from Delhi under #VandeBharatMission returns mid-way due to health issues of a crew member. More details awaited.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

एयर इंडिया च्या विमानाचा पायलट कोरोना पॉझिटिव्ह; मॉस्को ला जाणारे विमान माघारी - वंदे भारत मिशन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm