हजारो कामगारांना घेऊन धावली विशेष रेल्वे; बेळगावातून स्पेशल श्रमिक रेल्वे गोरखपुरला रवाना;

हजारो कामगारांना घेऊन धावली विशेष रेल्वे;
बेळगावातून स्पेशल श्रमिक रेल्वे गोरखपुरला रवाना;

belgavkar.com | belgaum | belgavkar

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून कर्नाटक व गोवा राज्यात अडकलेल्या श्रमिकांना घेऊन ट्रेन शनिवारी (30 मे) गोरखपुरकडे रवाना झाली. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करूनच ट्रेनमध्ये प्रवाशांना बसविण्यात आले आहे. 1700 प्रवाशांना घेऊन निघालेली ही ट्रेन थेट गोरखपुरला पोहोचणार असून तेथील प्रशासन प्रत्येकाला आपआपल्या घरी जाण्यासाठी व्यवस्था करून देणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
देशात कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा वाढाता फैलाव पाहता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. परिणामी हातावर पोट असलेल्या कामरागांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र समोर येत आहे. हाती काम नाही आणि उपासमारीमुळे कामगारांनी पायी आपल्या गावची वाट धरली होती. या कामगारांसाठी रेल्वे मंत्रालयानं त्यांना आपल्या राज्यात पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुरूवात केली आहे. परप्रांतातील मजूर आणि कामगारांसाठी बेळगाव - गोरखपुर विशेष श्रमिक रेल्वे सायंकाळी 9 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावरुन रवाना झाल्याची माहिती, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली आहे. कर्नाटक आणि गोवा येथील कामगार बेळगाव येथून गोरखपुरला रवाना झाले आहेत.
तब्बल दोन तास उशिरा निघालेल्या स्पेशल ट्रेन मधील परप्रांतीय मजुरांना निरोप देण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर बोम्मनहळ्ळी बेळगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. गोरखपुरला रवाना झालेल्या सर्व प्रवाशांची थर्मल टेस्टिंग करण्यात आली. त्याचबरोबर सामाजिक अंतर पाळून सर्व प्रवाशांना रेल्वेमध्ये बसविण्यात आले. यावेळी पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत होती. गोरखपुर ला रवाना झालेल्या प्रवाशांसाठी, भोजन आणि पाण्याचीही प्रशासनाच्यावतीने व्यवस्था करण्यात आली. बेळगावातून निघालेली श्रमिक ट्रेन 1 जून रोजी सकाळी 9 वाजता गोरखपुरला पोहोचणार आहे. त्यानंतर गोरखपुर येथून सायंकाळी 5 वाजता सुटेल व 3 जून रोजी सकाळी 8 वाजता बेळगाव येथे पोहोचणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

हजारो कामगारांना घेऊन धावली विशेष रेल्वे; बेळगावातून स्पेशल श्रमिक रेल्वे गोरखपुरला रवाना;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm