पावसाळ्यापुर्वी नाल्यातील गाळ काढण्याची मागणी;

पावसाळ्यापुर्वी नाल्यातील गाळ काढण्याची मागणी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

गुडशेड रोड, शास्त्रीनगर क्राॅस 2 ते अपूर्वा हाॅस्पीटल मागून जाऊन एसपीएम रोड, कपिलेश्वर कॉलनी मार्गे पुढे धारवाड रोड येथे बळ्ळारी नाल्याला मिळालेल्या नाल्यातील गाळ पावसाळ्यापुर्वी काढणे गरजेचे आहे. अन्यथा यावर्षीही नाल्या शेजारील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून बेळगाव महानगरपालीकेच्या अधिकार्यानी एकमेकाच्या समन्वयाने तातडीने पावले उचलत नाल्यातील गाळ काढावा. गाळ फक्त काठावर न ठेवता लगेच उचलला जावा.
त्यासोबतच नाल्याशेजारील अतीक्रमण हटवून नाल्याचे बफर झोनही स्वच्छ करुन नाल्याचे पात्र पूर्वीसारखे रुंद करुन नाला दोन्हीबाजूनी बांधून घ्यावा. जेणेकरुन दरवर्षी प्रशासनाचा नाला रुंदीकरणासाठीचा खर्च वाचेल व डोकेदुखीही थांबेल. याबाबतचे निवेदन शास्त्रीनगरवासीयांतर्फे माई पाटील, राहुल पाटील, शेखर वाईंगडे, पवन जुवेकर, दिपक मालवदे, अमृत यलजी, कांबळे मँडम यांच्या वतीने महानगरपालिकेच्या उपआयुक्त लक्ष्मी निप्पाणीकर यांना दिले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पावसाळ्यापुर्वी नाल्यातील गाळ काढण्याची मागणी;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm