Lockdown 5.0 देशातील लॉकडाऊन वाढवला, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत

Lockdown 5.0 देशातील लॉकडाऊन वाढवला, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत

belgavkar.com | belgaum | belgavkar

Lockdown कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला  आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आले असुन या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहेत. प्रतिबंधित भाग / कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध  टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
याअंतर्गत कंटेनमेंट झोनच्या बाहेर असलेल्या ठिकाणांना टप्प्याटप्प्याने सूट दिली जाणार आहे, परंतु सध्या यावर पूर्णपणे बंदी राहील. ही नियमावली 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू राहील. सध्याचा रात्रीचा कर्फ्यू सुरूच राहणार असून, अत्यावश्यक वस्तूंसाठी कोणताही कर्फ्यू असणार नाही. रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू राहील. सध्या संध्याकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत हा कर्फ्यू आहे. शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्था सुरू करण्यावर सरकार कालांतरानं निर्णय घेणार आहे.
लॉकडाऊन 5 साठी सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. ग्रीन, रेड, ऑरेंज झोन रद्द करुन केवळ कंटेन्मेंट झोन असणार आहे. चित्रपटगृह, स्विमिंग पूल, जिम, आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद राहणार आहे. दुकानांमध्ये केवळ 5 लोक एकावेळी खरेदी करु शकतात. अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोक उपस्थित राहू शकतात.
लॉकडाऊन 5.0 कंटेनमेंट झोनमधील फेजनुसार सूट दिली जाणार आहे.

फेज 1 मध्ये : 8 जूनपासून पूजास्थळे उघडली जातील, हॉटेल, रेस्टॉरंट उघडले जाईल, शॉपिंग मॉल्स उघडली जातील.

फेज 2 मध्ये : जुलैमध्ये सर्व संबंधित पक्षांशी शाळा महाविद्यालये उघडण्यासाठी इत्यादींशी बोलण्याचा निर्णय घेण्यात येईल.

फेज 3 मध्ये : स्थितीचे मूल्यांकन आणि निर्णय घेण्यात येईल, आंतरराष्ट्रीय उड्डाण, मेट्रो, सिनेमा हॉल, जिम, थिएटर, बार, सामाजिक, राजकीय, खेळ, धार्मिक कार्यक्रम आदी.
कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात
धार्मिक स्थळं, हॉटेल्स अन् मॉल 8 जूनपासून सुरू होणार आहेत.



आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं, मेट्रो रेल्वे, सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जिम, जलतरण तलाव, उद्याने इत्यादी सुरू करण्यासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
लॉकडाऊन कसा वाढत गेला?
Lockdown कालावधी
पहिला लॉकडाऊन  25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन  15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन 4 मे ते 17 मे
चौथा लॉकडाऊन  18 मे ते 31 मे
पाचवा लॉकडाऊन 1 जून ते 30 जून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Lockdown 5.0 देशातील लॉकडाऊन वाढवला, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत
Lockdown कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm