फेक MSME वेबसाईटद्वारे उद्योजकाची आर्थिक फसवणूक;

फेक MSME वेबसाईटद्वारे उद्योजकाची आर्थिक फसवणूक;

belgavkar.com | belgaum | belgavkar

हुबेहुब सरकारच्या नोंदणीकृत वेबसाईटप्रमाणेच फेक वेबसाईट

बेळगाव : नवीन उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या 'एमएसएमई' या नोंदणीकृत वेबसाईटवर नोंदणी करण्यात येते. औद्योगिक खात्याच्या (MSME) नावाने बनावट वेबसाईटद्वारे नोंदणी करून घेऊन उद्योजकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबाबत बंगळूरच्या विजयनगर येथील उद्योजक डी. योगेश यांनी सीईएन पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी योगेश यांनी एमएसएमई या नोंदणीकृत वेबसाईटचा गुगलवर शोध घेतला असता, त्यांना हुबेहुब केंद्र सरकारच्या नोंदणीकृत वेबसाईटप्रमाणेच असणारी www.msme-udyogaadhaar.com ही फेक वेबसाईट दिसली.
माञ केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट Udyog Aadhaar www.udyogaadhaar.gov.in ही आहे. त्या फेक MSME / SSI / Udyog Aadhaar - Registration साईटवर योगेश यांनी उद्योग सुरू करण्यासाठी आपला पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार, पॅन व आवश्यक माहिती अपलोड केली. यासाठी 1850 रु. नोंदणी शुल्कही भरले. योगेश यांना ई - मेलद्वारे नोंदणी शुल्क पावतीही देण्यात आली. मात्र, पावती पाहिल्यानंतर सदर नोंदणी शुल्क खासगी कंपनीच्या बँक खात्यावर अदा झाले असल्याचे दिसून आले. शंका आल्याने त्यांनी फोनवरून चौकशी केली. त्यावर सर्व कागदपत्रे केंद्र सरकारच्या वेबसाईटवर अपलोड करा, मग उद्योग आधारपत्र देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर, योगेश यांनी आणखी सर्च करून केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट पाहिली असता नोंदणी मोफत असल्याचे दिसून आले. आपण फसलो गेल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी सीईएन पोलिस स्थानकात अज्ञाताविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

फेक MSME वेबसाईटद्वारे उद्योजकाची आर्थिक फसवणूक;
हुबेहुब सरकारच्या नोंदणीकृत वेबसाईटप्रमाणेच फेक वेबसाईट

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm