बेळगाव : विजेचा धक्का बसून लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : विजेचा धक्का बसून लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अलारवाड येथे दुरुस्ती करीत असताना विजेचा धक्का बसून हेस्कॉम लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. राचय्या केरीमठ असे या दुर्दैवी लाईनमनचे नाव आहे. शुक्रवारी रात्री तो आपले काम संपवून घरी गेला होता. त्यावेळी अलारवाड येथे लाईट गेली होती. त्यामुळे अलारवाड येथील आश्रय काॅलनी येथे ट्रांसफाॅर्मर दुरुस्ती करीत असताना अचानक त्याला शॉक लागला.
अलारवाड मधील लोकांनी त्याला लागलीच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राचय्या हा नोकरीत परमनंट होऊन दोनच महिने झाले होता.
हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद यांनी आपण यासंदर्भात घटनास्थळी जाऊन माहिती घेतल्याचे सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : विजेचा धक्का बसून लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm