बेळगावच्या 'या' गावात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याची शक्यता...

बेळगावच्या 'या' गावात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याची शक्यता...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरापासुन 14 किमी अंतरावर असलेल्या कर्नाटक - महाराष्र्ट सीमेजवळील तुरमुरी गावामध्ये क्वारंटाईन असलेल्या महिलेला कोरोना व्हायरस झाल्याची शक्यता आहे. संशयित महिलेला 30 मे रोजी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मुंबईवरुन आलेली व आंतर राज्य प्रवास केलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची दाट शक्यता गावात वर्तविली जात आहे. बातमी आसपासच्या गावांमध्ये पसरली आहे. आज दुपारच्या आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये याबाबत अधिकृत माहिती मिळताच याची पुष्टी होईल.
माञ ही शक्यता सत्यता बदलणार की एक पसरलेली कोरोनाची अफवा हे आरोग्य विभागाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये होणार आहे.
ऑरेंज झोन बेळगाव जिल्ह्यात 30 मे रोजी बुलेटिनमध्ये एकाला कोरोनाची (CoVID-19) लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 140 झाली आहे. जिल्ह्यात एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 106 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (डिस्चार्ज) झालेले आहेत. एकुण 41 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टीव्ह / सक्रीय रुग्णांवर रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत.
बेळगावमध्ये आढळलेल्या CoVID-19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती Media Bulletin CoVID-19
Patient details Age-Sex History
P-2806 30 Female तुरमुरी बेळगाव - ISTH - आंतर राज्य प्रवास मुंबई महाराष्र्ट

ISTH : Inter State Travel History आंतर राज्य प्रवास
* म्हणजे संपर्कात, ** म्हणजे Secondary contact संपर्कात
मुंबईवरून आलेल्या व बेळगाव शहरापासुन 14 किमीवर असलेल्या महाराष्र्ट - कर्नाटक सीमेवरील तुरमुरी गावातील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुपारचे कोरोना व्हायरस मीडिया बुलेटिन प्रसिद्ध होणार नाही...
गेल्या काही दिवसांत कर्नाटकात कोरोना प्रकरणांची संख्या वाढल्यामुळे आणि देशातील अन्य राज्यांतील मार्गसुचीनुसार आज शनिवार 30 मे पासुन दुपारचे कोरोना व्हायरस मीडिया बुलेटिन प्रसिद्ध होणार नाही, असा टास्क फोर्सने निर्णय घेतला. यापुढे राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंञी फक्त दिवसातुन एकदाच संध्याकाळी पत्रकार परिषदेत नेहमीसारखे पूर्ण तपशिलासह राज्यातील कोरोना आकडेवारांची माहिती देतील.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावच्या 'या' गावात कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याची शक्यता...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm