उद्याचा रविवार कडकडीत लॉकडाऊन नाही;  Lockdownn मध्ये उद्या सर्व व्यवहार सुरु राहणार... माञ सायंकाळनंतर संचारबंदी

उद्याचा रविवार कडकडीत लॉकडाऊन नाही;
Lockdownn मध्ये उद्या सर्व व्यवहार सुरु राहणार... माञ सायंकाळनंतर संचारबंदी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : देशभरात येत्या 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे ते 31 मे पर्यंत असा 14 दिवसांचा असणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कर्नाटक राज्य सरकारकडून लॉकडाउन-4 नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने 31 मे दरम्यान च्या दोन्ही रविवारी (24 मे आणि 31 मे) संपूर्ण राज्यात कडकडीत लॉकडाउन पाळण्याचे आदेश दिले होते. सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण अनावश्यक व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश होते. माञ उद्या 31 मेच्या रविवारी कर्नाटकात सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु राहणार असल्याची माहिती मुख्यमंञी बीएस येडीयुरप्पा यांनी दिली आहे. उद्या कडकडीत Lockdown नसणार आहे. सर्व जीवनाश्यक व अनावश्यक व्यवहार व गोष्टींना परवानगी असेल.
माञ.... सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी...
माञ कोरोना या विषाणुमुळे आरोग्य विषयक आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे तसेच कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ. बी. एस. बोम्मनहळ्ळी यांनी 23 मार्चपासुन जारी असलेला जमावबंदीचा आदेश 31 मे पर्यंत वाढविला आहे. 31 मे च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी वाढविण्यात आली आहे. शहर आयुक्तालय हद्दीत व पोलीस अधिक्षक ग्रामिण यांच्या हद्दीत पुन्हा भादंवि कलम 144 पुन्हा लागू होणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी डाॅ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी अगोदरच केली आहे. या वेळेत जिल्ह्यात सीआरपीसी 144 कलम लागू केले असून, नागरिकांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच, घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. जमावबंदी कलम लागू केल्‍यामुळे पाच व्‍यक्‍तींपेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकत्रित येणार नाहीत, याची दक्षता नागरिकांनी घ्‍यावी. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
कोरोना वायरसच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात, जनमानसात अफवा, अपप्रचार व भीती निर्माण करणारे मजकूर, व्हिडिओ आदी संदेश व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्यूटर,सोशल मिडिया व होर्डीग आदींच्या माध्यमातून प्रसारीत करु नये. तसेच अधिकृत माध्यमाव्दारे माहिती न घेता दिशाभुल करणारी माहिती प्रसार माध्यमावर प्रसारीत करु नये.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

उद्याचा रविवार कडकडीत लॉकडाऊन नाही; Lockdownn मध्ये उद्या सर्व व्यवहार सुरु राहणार... माञ सायंकाळनंतर संचारबंदी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm