पोहता येत नसतानाही विहिरीत उडी घेतलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; चिकोडी तालुक्यातील घटना

पोहता येत नसतानाही विहिरीत उडी घेतलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू;
चिकोडी तालुक्यातील घटना

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. चिक्कोडी : पाहुण्यांकडे सुटीसाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाने पोहता येत नसतानाही विहिरीत उडी घेतल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी नागराळ (ता. चिक्कोडी ) येथे घडली. सचित अजित कोळेकर (रा. शमनेवाडी) असे मुलाचे नाव आहे. सचित आठ दिवसांपासून पाहुण्यांकडे सुटीसाठी आला होता. शेजारील मुले विहिरीत पोहण्यास जात असताना त्याला पोहता येत नसतानाही तो त्यांच्यासोबत गेला होता. सोबत येणारी मुले करेप्पा कडोलकर यांच्या विहिरीत पोहून झाल्यानंतर शेजारील क्षेत्रात भाजीपाला काढण्यासाठी गेली होती.
कोणीही नसताना सचितने पोहता येत नसतानाही विहिरीत अचानक उडी घेतली. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोबत आलेल्या मित्रांना तो आपल्यात नसल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर काही युवकांनी विहिरीत उडी घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी चिक्कोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. चिकोडी पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पोहता येत नसतानाही विहिरीत उडी घेतलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू; चिकोडी तालुक्यातील घटना

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm