लाॅकडाऊनमध्ये बेळगाव शहरात गो - मांसची वाहतूक करणारे वाहन जप्त

लाॅकडाऊनमध्ये बेळगाव शहरात गो - मांसची वाहतूक करणारे वाहन जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

लाॅकडाऊनमध्ये गोवावेसवरून उद्यमबागकडे गो-मांस वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी टिळकवाडी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी ते वाहन अडवून जप्त केले आहे. कोरोनामुळे लाॅकडाऊन असताना व सायंकाळी 7 नंतर वाहतुकीला परवानगी नसताना असताना अशा प्रकारे गो - मांसाची वाहतूक होत आहे.
उद्यमबागकडे टाटाएस गाडीतुन (KA 22 A 8149) यामधून गो-मांसची वाहतूकाची माहिती बजरंग दलच्या गोरक्षकांना समजताच त्यांनी टिळकवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर वाहन थांबवून जप्त करण्यात आले. याचबरोबर चालकावर कर्नाटक गोहत्या प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी सुनील अर्जुन गौराने (रा. गणपत गल्ली, मजगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. टिळकवाडी पोलिसांनी वाहन जप्त केले असून चालकावर गुन्हा नोंदविला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

लाॅकडाऊनमध्ये बेळगाव शहरात गो - मांसची वाहतूक करणारे वाहन जप्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm