घरबसल्या 10 मिनिटांत मोफत बनवू शकता PAN कार्ड, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लाँच केली नवी योजना

घरबसल्या 10 मिनिटांत मोफत बनवू शकता PAN कार्ड, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लाँच केली नवी योजना

belgavkar.com | belgaum | belgavkar

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी PAN तात्काळ स्वरूपात ऑनलाइन मिळवण्याची सुविधा लाँच केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष बोर्ड (CBDT) ने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. CBDTने दिलेल्या माहितीनुसार ही सुविधा केवळ अशा नागरिकांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आहे, तसंच त्यांचा मोबाइल नंबरही आधार बरोबर जोडण्यात आलेला आहे. या सुविधेचं बिटा व्हर्जन फेब्रवारी 2020 मध्येच सुरू करण्यात आले होते. ही सुविधा आयकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवर ट्रायल बेसिसवर सुरू करण्यात आली होती. मात्र आता ही योजना अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे.
पॅन कार्ड देण्याची (PAN allotment) ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस असेल.
अर्जदारांना हे इ-पॅन कोणत्याही शूल्काशिवाय जारी केले जाईल.
CBDTने दिलेल्या माहितीनुसार डिजिटल इंडिया अंतर्गत आयकर विभागाने ही योजना लाँच केली आहे. आयकर विभागाच्या या निर्णयानंतर करदात्यांना प्रक्रियेचं पालन करणे सोपे जाईल.
1. ऑनलाइन पॅनकार्डसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला आयकर विभागाच्या e-Filing पोर्टल वर जाऊन 'Instant PAN through Aadhaar' मध्ये दिसणाऱ्या 'Quick Links' वर क्लिक करावे लागेल.
2. या पेजवर 'Get New PAN' या पर्यायावर क्लिक करा
3. याठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी जेनरेट करण्यासाठी कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. ज्याला तुम्हा व्हॅलिडेट करावे लागेल.
4. पुढच्या स्टेपमध्ये आधार कार्डची माहिती व्हॅलिडेट करावी लागेल.
5. तुम्हाला तुमचा Email देखील व्हॅलिडेट करण्याची गरज आहे.
6. यूनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) कडून e-KYC डेटा व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला इनस्टंट पॅन दिले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याकरता कमीत कमी 10 मिनिटं लागतील.
7. यानंतर 'Check Status/ Download PAN' वर क्लिक केल्यानंतर PDF फॉरमॅटमध्ये तुम्ही पॅन डाऊनलोड करू शकता.
ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे या प्रक्रियेतून पॅन त्यांनाच मिळेल ज्यांच्याकडे आधीच पॅन नाही आहे. त्याचप्रमाणे तुमचा आधार आणि मोबाइल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. आधारवर जन्मतारीखही असणे आवश्यक आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

घरबसल्या 10 मिनिटांत मोफत बनवू शकता PAN कार्ड, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लाँच केली नवी योजना

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm