कर्नाटकात लवकरच हेल्थ रजिस्टर; सर्वांच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती

कर्नाटकात लवकरच हेल्थ रजिस्टर;
सर्वांच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : राज्यातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्य स्थितीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याद्वारे हेल्थ रजिस्टर State Health Register तयार करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. सुधाकर यांनी दिली. अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, हेल्थ रजिस्टर तयार करण्याबाबत विविध 18 विभागांतील खासगी आणि सरकारी क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. या सर्वेक्षणामुळे आगामी काळात सरकारला आवश्यक माहिती तत्काळ मिळणे शक्य होणार आहे.
भारतात कोणत्याही राज्याने असे सर्वेक्षण हाती घेतलेले नाही. सर्वांच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती घेऊन रजिस्टरमध्ये नोंद केली जाणार आहे. सर्वप्रथम चिक्कबळ्ळापूर येथे प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षण होईल. राज्यातील जनतेचे हेल्थ रजिस्टर तयार केले जाणार आहे. यामुळे आरोग्य सेवेत सुधारणा करणे शक्य होईल. आशा स्वयंसेविका, खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने माहिती संग्रहित केली जाणार आहे. याविषयीची प्रश्नावली दोन दिवसांत तयार केली जाईल. आगामी काळात अन्न, पाणी कसे असावे, याचाही समावेश सर्वेक्षणात केला जाणार आहे. जनतेने आवश्यक माहिती सविस्तर देण्याचे आवाहन डॉ. सुधाकर यांनी केले.
Karnataka to soon have health register of all citizens

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकात लवकरच हेल्थ रजिस्टर; सर्वांच्या आरोग्याविषयी संपूर्ण माहिती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm