'यंदाचा' ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहाने... माञ साधेपणाने...

'यंदाचा' ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहाने... माञ साधेपणाने...

belgavkar.com | belgaum | belgavkar

'लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ बेळगाव' च्यावतीने नियमावली

शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव बेळगावात साजरा करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाचे सरचिटणीस हेमंत हावळ यांनी दिली आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण राज्यात नावलौकिक असलेला बेळगावचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ बेळगाव आणि मूर्तिकार, विक्रते, संघ बेळगाव यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. समादेवी मंगल कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.
बैठकी दरम्यान यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सव मंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने पूजा अर्चा, आरती असे सर्व धार्मिकविधी पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या आरोग्य सुरक्षेची काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. येत्या काळात येणाऱ्या गणेशोत्सवारही कोरोनाचं संकट आहे. राज्यासह आजूबाजूच्या कानाकोपऱ्यातील लोक बेळगावात बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. गणेशोत्सवाचे 10 दिवस बेळगाव गजबजलेली असते. परंतु, यंदा कोरोनामुळं गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी केले. त्याचप्रमाणे नियमावली देखील महमंडळाचे उपाध्यक्ष गिरीश धोंगडी कडून जाहीर करण्यात आली आहे.
वर्गणी - बेळगावातील मोठ्या मंडळांनी (आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. मात्र, केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करणे.
श्रीमूर्ती - कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित 10 फुट उंचीचा आग्रह करू नये. शक्य असल्यास 5 फूट मूर्तीस प्राधान्य द्यावे.
मंडप/रोषणाई - मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा. या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.
आगमन - श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटीझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे.
श्री दर्शन - मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस (भटजी, कार्यकते इ), हात - पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करणे.
कार्यक्रम - गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे.
विसर्जन - आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी, जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कपिलेश्वर येथील कृत्रिम तलावात श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.
22 ऑगस्टला गणेश उत्सव सुरू होत आहे. तोपर्यंत कोरोनाची राज्यात काय परिस्थिती असेल त्यावरही हा निर्णय अवलंबून असणार आहे.
गणरायाला मास्क नको : या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूतीर्कारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये. जेणेकरून पावित्र्य भंग होईल असे करू नये, अशी सूचना सुनिल जाधव यांनी मंडळांना आणि गणेश भक्तांना केली.
तसेच यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व मूर्ति विक्रते यांच्या येणाऱ्या समस्यांचा विचार करण्यात आला. सर्व समस्या प्रशासनाशी चर्चा करून सोडवण्याची ग्वाही देण्यात आली. यावेळी प्लास्टर मिळणे संदर्भात, मूर्ती महाराष्ट्रातुन आणण्यासाठी पास व्यवस्था, मुर्तीकारांना शासनाकडून कर्ज मिळणेबाबत विविध समस्येवर चर्चा करण्यात आली.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, गिरीश धोंगडी, सुनील जाधव, गजानन देवरमनी, अर्जुन राजपूत, नितीन जाधव, योगेश कलघटगी, गजानन हांगीरगेकर, आनंद बडगीर, मूर्तिकार संजय किल्लेकर, रवी लोहार, विक्रांत पाटील, विद्याधर लोहार, विशाल गोदे, महेश दळवी, मनोहर पाटील, प्रकाश बडमंजी, विनायक पाटील, विनायक कणेरी यासह अन्य मूर्तिकार उपस्थित होते. प्रास्तविक नितीन जाधव यांनी केले, तर गजानन देवरमनी यांनी आभार मानले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

'यंदाचा' ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहाने... माञ साधेपणाने...
'लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ बेळगाव' च्यावतीने नियमावली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm