कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत भारताने चीनला टाकले मागे; मागील 24 तासांत भारतात कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वात मोठी वाढ

कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत भारताने चीनला टाकले मागे;
मागील 24 तासांत भारतात कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वात मोठी वाढ

belgavkar.com | belgaum | belgavkar

देशभरात मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल 7466 नवे रुग्ण आणि 175 मृत्यू नोंदवले गेले आहेत. आजवरची ही सर्वात मोठी वाढ असून यानुसार आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,65,799 वर पोहचला आहे. आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सद्य घडीला 89987 कोरोना ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत 71105 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. दुर्दैवाने 4706 रुग्णांचा या विषाणूने जीव घेतला आहे.
आजच्या या आकडेवारीनुसार आता भारताने चीन ला कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत मागे टाकले आहे. ज्या चीन मधून कोरोनाचा उद्रेक सुरु झाला तिथे आजवर कोरोनाचे 82 हजार 995 रुग्ण आढळले आहेत तर त्यातील 4  हजार 634 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात सध्या 1 लाख 65 हजार 799 रुग्ण असून मृतांचा आकडा 4706 इतका झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे 59546 इतके रुग्ण असून यापैकी 38939 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजवर 18616 जणांनी कोरोनावर मात केली असून 1982 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ तामिळनाडू येथे सुद्धा कोरोनाचे 18545 रुग्ण, दिल्ली मध्ये 15257 तर गुजरात मध्ये 15195 रुग्ण आढळून आले आहेत. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत भारताने चीनला टाकले मागे; मागील 24 तासांत भारतात कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वात मोठी वाढ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm