'क्वारंटाईन' संदर्भातील नियमात मोठा बदल; आता 7 दिवस क्वारंटाईन... माञ... कर्नाटक सरकारची मार्गसूची

'क्वारंटाईन' संदर्भातील नियमात मोठा बदल;
आता 7 दिवस क्वारंटाईन... माञ... कर्नाटक सरकारची मार्गसूची

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकात प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. परदेश, परराज्यांतून (महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश तामिळनाडू आणि गुजरात ही सहा राज्ये वगळून) कर्नाटकात प्रवेश करणार्‍यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत होते. त्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली होती. आता संबंधितांना केवळ 7 दिवस क्वारंटाईन करण्यात येत असून या नव्या नियमांनुसार एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसल्यास आणि त्याची प्रकृती स्थिर असल्यास कोरोना चाचणी न करताच घरी पाठवले जाणार आहे. मात्र, पुढील 7 दिवस त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. याबाबतची नवी मार्गसूची कर्नाटक राज्य शासनाने गुरूवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांना वगळून उर्वरित ठिकाणच्या सर्व प्रवाशांना नवी मार्गसूची लागू असणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार नवी याबाबतचे परिपत्रक आरोग्य खात्याने जारी केले आहे. कोणत्याही आंतरराज्य प्रवाशाला केवळ 7 दिवस क्वारंटाईन करून त्याच्यात आरोग्याची लक्षणे नसतील तर पुढील 7 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करता येते. पण, त्यांना क्वारंटाईनमधून सोडण्याआधी वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे असेल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच यापूर्वी क्वारंटाईनचा कालावधी 14 दिवसांचा होता. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला असून, 14 दिवसांच्याऐवजी 7 दिवस क्वारंटाईन करण्यात येईल.
आतापर्यंत हॉटेलमध्ये क्वारंटाईन असणार्‍यांची पाचव्या दिवशी कोरोना चाचणी केली जात होती. अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना होम क्वारंटाईन केले जात होते. रोगाची लक्षणे नसणार्‍या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता एकदम कमी असते. होम क्वारंटाईनमध्ये असताना संबंधित व्यक्ती वेगळी राहते. त्यामुळे रोगाची लक्षणे दिसून आल्यास आरोग्य खात्याला तत्काळ कळवले जाते. त्या व्यक्तीची चाचणी केल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातात.
सरकारने जारी केलेल्या नव्या नियमामुळे दीर्घ काळ हॉटेलमध्ये क्वारंटाईन झालेल्यांना दिलासा मिळाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

'क्वारंटाईन' संदर्भातील नियमात मोठा बदल; आता 7 दिवस क्वारंटाईन... माञ... कर्नाटक सरकारची मार्गसूची

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm