पुरस्काराची रक्कम विद्यार्थिनीने दिली मुख्यमंत्री निधीला; दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी हजारो मास्क स्वतः शिवले

पुरस्काराची रक्कम विद्यार्थिनीने दिली मुख्यमंत्री निधीला;
दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी हजारो मास्क स्वतः शिवले

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी दहावीची विद्यार्थिनी बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी बेळगाव.
श्रेया बालपणापासूनच प्रतिभावंत विद्यार्थिनी आहे. श्रेया या विद्यार्थिनीने कौतुकास्पद असे कार्य केले आहे. नुकतेच कर्नाटक सरकारने श्रेयाला बेळगाव जिल्ह्यातील साधारण विद्यार्थिनी हा पुरस्कार देण्याचे ठरविले असून 10000 रूपये तिच्या खात्याला जमा केले आहे. या निधीचा सदुपयोग म्हणून श्रेयाने ती रक्कम मुख्यमंत्री राहत कोश मध्ये जमा केली आहे. अभिनय स्पर्धेमध्ये जिंकलेले 5000 आणि नृत्य स्पर्धेत जिंकलेले 3000 रुपये असे एकूण 8000 रुपयातून तीने दहावी परीक्षेला येणाऱ्या सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी 1000 मास्क स्वतः शिवले आहे.
निधी व मास्क श्रेयाने माजी मुख्यमंत्री विद्यमान पालकमंत्री जगदीश शेट्टर यांना सुपूर्त केले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, राज्यसभा सांसद प्रभाकर कोरे, उत्तरचे आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ, माननीय जिल्हाधिकारी डाॅ. एस. बी. बोम्मनहळ्ळी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित होते.
या कार्यात श्रेया ची आई रूपाली, श्रेयाचे डान्स मास्टर रवी शेठ, शाळेचे शिक्षक नेत्रा कुलकर्णी, एकनाथ पाटील, मुख्याध्यापक नागेश दोणकरी, अभिनय गुरु नीता कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पुरस्काराची रक्कम विद्यार्थिनीने दिली मुख्यमंत्री निधीला; दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी हजारो मास्क स्वतः शिवले

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm