कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय;
महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली

belgavkar.com | belgaum | belgavkar

रेल्वे, विमानासह इतर वाहनांना प्रवेश बंद;
Lockdown-5 चे संकेत

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत कर्नाटक सरकारनं गुरूवारी मोठा निर्णय घेतला. Coronavirus कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्यानं कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रासह 5 राज्यातून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक कर्नाटकनं थांबवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक 15 दिवस म्हणजेच 15 जुन पर्यंत रद्द केली आहे.
देशात कोरोनामुळे अनेक राज्यांची स्थिती गंभीर आहे. कर्नाटकातील परिस्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत 2853 रुग्ण कर्नाटकात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हळूहळू सर्व सेवा सुरू करण्याची तयारी कर्नाटकातील बी. एस. येडियुरप्पा सरकारकडून सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वाहतुकीमुळे कोरोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे कायदामंत्री जे. सी. मधु स्वामी याबाबत म्हणाले की, पुढचे 10 ते 15 दिवस या राज्यांतून एकही कोरोनाचा रूग्ण कर्नाटकमध्ये येऊ नये याची आम्ही खबरदारी घेणार आहोत.
देशात लॉकडाउनला चौथ्या टप्प्यात मुदत वाढ दिल्यानंतर केंद्र सरकारनं अनेक बंधनं शिथिल केले आहेत. यात जीवनावश्यक असलेल्या आणि नसलेल्या वस्तुंची दुकानं सुरू करण्यास केंद्रानं परवानगी दिली. त्याचबरोबर विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडल्यानंतर मर्यादित स्वरूपात रेल्वे वाहतुकही सुरू केली.
विमान वाहतुकीलाही 25 मेपासून प्रारंभ झाला आहे. मात्र, यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीतीही अनेक राज्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
Karnataka suspends arrivals of flights, trains and vehicles from Maharashtra, Gujarat, Tamil Nadu, MP & Rajasthan into the state to contain the spread of COVID19.
कर्नाटकात रेल्वे, विमानासह इतर वाहनांना प्रवेश बंद; काही तासांतच सरकारने निर्णय बदलला
कर्नाटकने पाच राज्यांमधून वाहतूक बंद करण्याच्या संदर्भात मुख्यमंञी बी. एस. येडियुरप्पा यांंनी स्पष्टीकरण दिले आहे. या पाच राज्यांमधून अल्प संख्येने विमानांचे उड्डाणे भरतील तसेच लाॅकडाऊनमध्ये चालु असलेल्या श्रमिक रेल्वे चालुच राहतील. या राज्यांतून येणार्‍या आंतरराज्य वाहतूकीवर बंदी घालण्यात आली नाही : मुख्यमंञी बी. एस. येडियुरप्पा
We hereby clarify that there is no ban on flights and trains to Karnataka. But we have requested the Central govt to restrict the number of flights from high risk states.
While entry by road stays prohibited, trains that are already running will continue to do so. #InterStateTravel : BS Yediyurappa

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली
रेल्वे, विमानासह इतर वाहनांना प्रवेश बंद; Lockdown-5 चे संकेत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm