लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; युवतीची पोलिसात तक्रार...

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार;
युवतीची पोलिसात तक्रार...

belgavkar.com | belgaum | belgavkar

लग्नाच्या आणाभाका घेत वर्षांपासून एकमेकांसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या संबंधात वितुष्ट आले. प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने पोलिसांकडे धाव घेत प्रियकरावर बलात्काराचा आरोप लावला. तिच्या तक्रारीवरून चिकोडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. बेळगाव येथील एका युवतीवर चिकोडी येथे बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून चिकोडी येथील एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला.
संबंधित युवतीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळेलेल्या माहितीनुसार, चिकोडी येथील प्रशांत विष्णू जाधव या तरुणाने बेळगावात राहणार्या 26 वर्षीय युवतीसोबत बेळगावातच संसार थाटला होता. नंतर तिला चिकोडीला बोलावून घेतले होते. युवतीने लग्नासाठी बोलणी केल्याने तीला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी चिकोडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; युवतीची पोलिसात तक्रार...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm