कुसमळी ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक, सुदैवाने जिवीतहानी टळली

कुसमळी ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक, सुदैवाने जिवीतहानी टळली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बुधवारी (27 मे) सायंकाळी बेळगाव - गोवा राज्यमहामार्गावरील कुसमळी जवळील मलप्रभा ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक झाल्याने बेळगाव - गोवा अशी वाहतूक काल साडेपाच वाजल्यापासून बंद झाली आहे. हा पूल अरुंद असताना देखील दोन्ही वाहनचालकांनी न थांबता गाड्या पार करण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गाड्यांची धडक ब्रिजच्या कठड्याला बसल्याने ब्रिजला धक्का बसला आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली.
शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन मलप्रभा नदीवरील कुसमळी गावांजवळ असलेल्या ब्रिजवर अनेक अपघात झालेले आहेत. या ब्रिज जांबोटी भागाला जोडणारा महत्त्वाचा फुल आहे. या अपघाताची माहिती मिळताच खानापुर पोलीस उपनिरीक्षक बसनगौडा हे आपल्या सहकाऱ्यांशी अपघातस्थळी भेट देवुन मार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी जवळपास चार तास प्रयत्न केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कुसमळी ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक, सुदैवाने जिवीतहानी टळली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm