कोगनोळी चेकपोस्टवर सेवा बजावणारे चार पोलीस कोरोनाबाधीत -  कोरोना पॉझिटिव्ह

कोगनोळी चेकपोस्टवर सेवा बजावणारे चार पोलीस कोरोनाबाधीत - कोरोना पॉझिटिव्ह

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू केलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आला होत्या. अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही जिल्ह्यात प्रवेश अनिवार्य करण्यात आला होता. बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या वाहनांना प्रतिबंध केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले होते. यातील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग-4 वरील कोगनोळी चेकपोस्टवर सेवा बजावुन क्वारंटाईन असलेल्या हासन जिल्ह्यातील 4 पोलिसांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे आहे.
निपाणी (जि. बेळगाव) येथील महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर असणार्या कोगनोळी चेकपोस्टवर यातील तीन पोलीस सेवा बजावत होते. कर्नाटकात ई-पास असलेल्यांना प्रवेश दिला जात आहे. बेळगाव शहरच तसेच कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील पोलीस चेकपोस्टवर तैनात करण्यात आले आहेत. कोगनोळी चेकपोस्टवर महाराष्ट्रासह देशभरातून विविध राज्यांतून येणार्या प्रवाशांना अडवून त्यांची माहिती घेतली जात आहे.
अत्यावश्यक नसल्यामुळे व कुठलाही पास नसल्यामुळे अनेकांना प्रवेश दिला नाही. तीन पोलीसांना हासन येथील होलेनर्सीपुर येथे क्वारंटाईन करण्यात येणार होते. त्यामुळे या तिन्ही पोलीसांना आणण्यासाठी गेलेल्या ड्रायव्हर पोलीसाला देखील कोरोनाची लागन झाली आहे. या चारही पोलिसांना होलेनर्सीपुर येथे 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर कोगनोळी चेकपोस्टवर तपासणी दरम्यान अनेकांना लक्षणे आढळली आहेत. व शेकडो जणांना निपाणीत क्वारंटाईन केले होते. यातील बेळगाव जिल्ह्यातील 22, बागलकोट जिल्ह्यातील 8 जणांना कोरोना झाला आहे.
कर्नाटकातील कोरोनाचे ‘हे’ आहेत हाॅटस्पाॅट जिल्हे; टाॅप 4 मध्ये बेळगाव Coronavirus
एरिया एकुण कोरोना पाॅझिटिव्ह
बेंगळूर अर्बन Bangalore Urban 282
मंड्या Mandya 255
कलबुर्गी Kalaburagi 185
यादगिर Yadgir 156
बेळगाव Belgaum 139 + 8 (बागलकोट जिल्हा)
दावणगिरी Davangiri 142
चिक्कबळ्ळापूर 131
हासन Hasan 127
उडपी Udupi 120
बिदर Bidar 108
म्हैसुरु Mysuru 90
बागलकोट Bagalkot 79

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कोगनोळी चेकपोस्टवर सेवा बजावणारे चार पोलीस कोरोनाबाधीत - कोरोना पॉझिटिव्ह

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm