कर्नाटकातील मंदिरे ‘या’ दिवसापासून होणार सुरु... भाविक भक्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय

कर्नाटकातील मंदिरे ‘या’ दिवसापासून होणार सुरु... भाविक भक्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय

belgavkar.com | belgaum | belgavkar

देशात थैमान घातलेल्या संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशातील प्रमुख मंदिरे 23 मार्चपासुन दर्शनासाठी बंद आहेत. देवी-देवतांचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक मंदिरात गर्दी करत असतात. मात्र, यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते, त्यामुळे हा मंदिरे दर्शनासाठी बंद आहेत. 31 मे रोजी लाॅकडाऊन संपत असल्यामुळे कर्नाटक सरकारने 1 जूनपासून राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करणार असल्याची माहिती दिली आहे. 31 मे पर्यंत सर्व नियोजन पूर्ण केले जाईल आणि त्यानुसार नियम कळविले जाईल, अशी माहिती राज्याचे मजुराई विभागाचे राज्यमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी दिली आहे.
दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंंगची व्युहरचना आखण्यात येणार आहे त्यानंतर ग्रामस्थ तसेच भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात येणार आहेत. सरकारने मंदिर खुले करण्यासाठी आराखडा तयार केला असुन 1 जुनपासून मंदीरे सुरू होईल, अशी माहिती राज्यमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी दिली आहे. राज्यातील 52 मंदिरात ऑनलाईन सेवा बुकींग उद्यापासून सुरु होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यामध्ये ऑनलाईन दर्शनपास धारकांना दर्शनासाठी परवानगी दिली जाईल तसेच दर्शन रांगेत दोघांमधील अंतर सहा फूट असेल व दर्शनरांग बंद ठेऊन दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे भाविकांनी मूर्ती व समाधी समोर जास्त वेळ उभे राहू नये; म्हणून नियोजन करण्यात असल्याचे समजते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकातील मंदिरे ‘या’ दिवसापासून होणार सुरु... भाविक भक्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm