महापालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भात लवकरच योग्य निर्णय : बेळगाव जिल्हा पालकमंत्री

महापालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भात लवकरच योग्य निर्णय : बेळगाव जिल्हा पालकमंत्री

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनादरम्यान आर्थिक संकटात सापडलेल्या विणकर, फुल उत्पादक, टँक्सी-रिक्षा वाहनचालक आणि इतरांना कर्नाटक सरकारने आर्थीक मदत जाहिर केली आहे. ही मदत लवकरच देण्यात येईल, असे बेळगाव जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले. त्याचबरोबर वाढीव घरपट्टी संदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी आज मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत बोलताना सांगितले आहे.
आजच्या बैठकीत पालकमंत्री शेट्टर यांनी बेळगाव जिल्ह्यातील विविध प्रमुख विषयांबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर धोरणासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने सामुहिक प्रयत्नातून हाती घेण्यात आलेल्या कार्याचे कौतुकही केले.
आमदार अभय पाटील यांनी बेळगाव महापालिकेच्या वाढीव करा संदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. कोरोना मुळे गोरगरिबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योजक, व्यापारी हतबल झाले असल्याचे सांगितले. आमदार अभय पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी टॅक्स न वाढवण्याबाबत चर्चा केली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जनतेला वाढीव घरपट्टी भरण्यास शक्य नसल्याने आधी च्या टॅक्स ची जी रक्कम होती तीच ह्यावेळेस भरून घ्यावी व ज्यांनी वाढीव पट्टी भरलेली आहे त्यांना पुढच्या वेळी ऍडजस्ट करण्यासाठी बेंगळूरच्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली आहे.
यावेळी बोलताना शेट्टर म्हणाले की, स्वयंघोषित कर प्रणालीनुसार प्रत्येक तीन वर्षाने नवी कर आकारणी केली जात असते. त्यामुळे महापालिकेने नियमानुसार वाढीव कर आकारणी केली आहे. मात्र या वाढीव करा संदर्भात नगरविकास मंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

महापालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर्भात लवकरच योग्य निर्णय : बेळगाव जिल्हा पालकमंत्री

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm