बेंगळुरू रहस्यमयी आवाजाने हादरले;  आज लोकांनी एक विचित्र आवाज ऐकला.

बेंगळुरू रहस्यमयी आवाजाने हादरले;
आज लोकांनी एक विचित्र आवाज ऐकला.

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारतीय संरक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण

देशावर कोरोनासोबतच एका महाचक्रीवादळाचे संकट घोंगावत असताना बेंगळुरूमध्ये रहस्यमयी आवाजाने थरकाप उडविला आहे. बुधवारी दुपारी बेंगळुरुमध्ये एक रहस्यमयी आवाज ऐकायला आल्याने चर्चांना उत आला आहे. तर अधिकारीही भयभीत झाले असून थेट हवाई दलालाच सावध करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी बेंगळुरुच्या लोकांनी एक विचित्र आवाज ऐकला. हा असा आवाज होता, की भूकंप आला असेल किवा मोठा झटका बसला असेल. हा आवाज जवळपास 5 सेकंद घुमत होता. कर्नाटक सरकारच्या आपत्ती निवारण केंद्राकडून सांगण्यात आले की, हा कोणत्याही प्रकारचा भूकंप नव्हता. तसेच जमीनीमध्येही कोणत्याही प्रकारची कंपने झाली नाहीत. मात्र, जो आवाज होता तो वेगळाच होता.
बेंगळुरुच्या व्हाईटफिल्ड भागात या आवाजाची तिव्रता अधिक होती. यामुळे तेथील अधिकारी कमालीचे सतर्क झाले आहेत. तसेच हवाईदल आणि एचएएलशीही संपर्क साधण्यात आला आहे. आता त्यांच्या उत्तराची वाट पाहिली जात आहे.
बेंगळुरुचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी सांगितले की, साधारण तासाभरापूर्वी हा आवाज आला होता. मात्र, कोणालाही काही थांगपत्ता लागलेला नाही. तसेच कुठेही अद्याप नुकसान झाल्याचे किंवाम मदतीची मागणी केल्याचे समजलेले नाही. हा आवाज जवळपास 21 किमीपर्यंत ऐकायला गेला. यावरून नेटकऱ्यांमध्येही वेगवेगळ्या चर्चा झडू लागल्या होत्या. माञ याबाबत भारतीय संरक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.
'ही एक नित्यनियुक्त आयएएएफ टेस्ट फ्लाइट होती ज्यात सुपरसोनिक प्रोफाइल होते जे बेंगळुरू विमानतळावरून उड्डाण करते आणि शहर हद्दीबाहेरील एअरस्पेसमध्ये उड्डाण करणारे होते. हे विमान एअरक्राफ्ट सिस्टम व टेस्टिंग आस्थापना (एएसटीई) चे होते. ज्यांचे टेस्ट पायलट आणि फ्लाइट टेस्ट इंजिनियर्स नियमितपणे सर्व विमानांची तपासणी करतात. हे विमान 36,000 ते 40000 फूट उंचीच्या दरम्यान सुपरसोनिकपासून सबसॉनिक वेगाकडे खाली जात असताना ध्वनीफोटाचा आवाज ऐकू आला.' : संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, 'जेव्हा हे घडले तेव्हा विमान शहराच्या हद्दीपासून बरेच दूर होते. विमान एखाद्या व्यक्तीपासून 65 ते 80 किलोमीटर अंतरावर उड्डाण करत असतानाही ध्वनीचा आवाज एखाद्या निरीक्षकांना ऐकू येऊ शकतो आणि जाणवू शकतो.'
'It was a routine IAF Test Flight involving a supersonic profile which took off from Bengaluru Airport and flew in the allotted airspace well outside City limits. The aircraft was of Aircraft Systems and Testing Establishment (ASTE) whose Test Pilots & Flight Test Engineers routinely test out all aeroplanes. The sonic boom was probably heard while the aircraft was decelerating from supersonic to subsonic speed between 36,000 and 40000 feet altitude,' Ministry of Defence said in a statement.
Ministry of Defence further stated, 'The aircraft was far away from the city limits when this occurred. The sound of a sonic boom can be heard and felt by an observer even when the aircraft is flying as far away as 65 to 80 kilometres away from the person.'

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेंगळुरू रहस्यमयी आवाजाने हादरले; आज लोकांनी एक विचित्र आवाज ऐकला.
भारतीय संरक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm