बेळगावात छत्रपती संभाजी महाराजांचा 342 वा  राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा

बेळगावात छत्रपती संभाजी महाराजांचा 342 वा राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बेळगाव यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हिंदू तिथी नुसार धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज 342 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शिवप्रतिष्ठानचे विभाग प्रमुख, युवा समितीचे उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले. रौद्रनाम संवत्सरातील माघ शुक्ल 7, शके 1602 यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. यंदा शंभूराजांचा 342 वा राज्याभिषेक सोहळा हिंदू तिथीनुसार शुक्रवारी साजरा झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हिंदवी स्वराज्याची सर्व जबाबदारी त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आली. त्यामुळे शंभूराजांनी खचलेल्या रयतेला आधार देत आपला राज्याभिषेक करून घेतला. यावेळी त्यांनी जनतेला शिवरायांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील, याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी पुढील फाल्गुन महिन्यात सुरू होणाऱ्या धर्मवीर बलिदान मास या बद्दल माहिती दिली. शेवटी धेयमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विश्वनाथ पाटील, अजित जाधव, चंद्रकांत चौगुले, अमोल केसरकर, अनंत चौगुले, विजय कुंटे, गजानन निलजकर, रोहित रामकृष्ण येळ्ळूरकर, कपिल कामानाचे, प्रशांत कामती, प्रशांत बेळगोजी, राहुल हनमंताचे, ओंकार पुजारी, वैभव धामनेकर, गिरीश पाटील, मारुती पाटील, जोतिबा चोपडे, संकेत सुतार, नितीन कुलकर्णी यासह धारकरी, शिवभक्त आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात छत्रपती संभाजी महाराजांचा 342 वा राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm